Vande Bharat : देशातील दुसरी २० डब्यांची वंदे भारत ट्रेन महाराष्ट्र अन् तेलंगणातील ‘या’ दोन शहरांना जोडणार-vande bharat express nagpur secunderabad india second 20 coach semi high speed train ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vande Bharat : देशातील दुसरी २० डब्यांची वंदे भारत ट्रेन महाराष्ट्र अन् तेलंगणातील ‘या’ दोन शहरांना जोडणार

Vande Bharat : देशातील दुसरी २० डब्यांची वंदे भारत ट्रेन महाराष्ट्र अन् तेलंगणातील ‘या’ दोन शहरांना जोडणार

Sep 21, 2024 11:43 PM IST

नागपूर ते सिकंदराबाद जंक्शन दरम्यान देशातील दुसरी २० डब्यांची वंदे इंडिया एक्स्प्रेस धावू लागली आहे. नुकतेच या गाडीचे उद्घाटन करण्यात आले आहे. या रेल्वेमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

वंदे भारत ट्रेन
वंदे भारत ट्रेन

Vande Bharat Train : नागपूर ते सिकंदराबाद जंक्शन दरम्यान देशातील दुसरी २० डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली आहे. नुकतेच या गाडीचे उद्घाटन करण्यात आले आहे. या रेल्वेमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. ट्रेन क्रमांक २०१०१/२०१०२ म्हणून अधिकृतरित्या नोंदणी कृत ही ट्रेन भारतातील ६५ वी वंदे भारत ट्रेन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ सप्टेंबर२०२४ रोजी या ट्रेनचे उद्घाटन केले होते.

ही गाडी मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार असून ५७५ किलोमीटरचे अंतर अवघ्या ७ तास १५ मिनिटांत पार करणार आहे. या दरम्यान ट्रेनचा वेग ताशी ७९ किमी आहे. नागपूरहून येणारी ही गाडी सात स्थानकांवर थांबते. यामध्ये नागपूर जंक्शन, सेवाग्राम जंक्शन, चंद्रपूर, बल्लारशहा, रामागुंडम, काझीपेट जंक्शन आणि सिकंदराबाद जंक्शन यांचा समावेश आहे.

नागपूर जंक्शनवरून ही गाडी पहाटे पाच वाजता सुटते व पहिल्या स्टॉप सेवाग्राम जंक्शनवर ५ वाजून ४३ मिनिटांनी पोहोचते. त्यानंतर ७.०३ वाजता चंद्रपूर, ७.२० वाजता बल्लारशहा पोहोचते. पुढचा स्टॉप रामागुंडम आहे, जिथे ट्रेन ९.०८ वाजता पोहोचते. त्यानंतर सकाळी १०.०४ वाजता काझीपेटला पोहोचते आणि शेवटी १२.१५ वाजता सिकंदराबादला पोहोचते. परतीच्या प्रवासात ही गाडी सिकंदराबादहून दुपारी १ वाजता सुटते आणि रात्री ८.२० वाजता नागपूरला पोहोचते.

देशात आतापर्यंत ६५ वंदे भारत एक्सप्रेस सुरू -

देशात आतापर्यंत ६५ वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. पहिली वंदे भारत एक्स्प्रेस १५ नोव्हेंबर २०१९ रोजी नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान सुरु झाली होती. महाराष्ट्रात पहिली ट्रेन सप्टेंबर २०२२ मध्ये मुंबई ते गांधीनगर दरम्यान धावली. देशभरात वंदे भारत ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळत असून वंदे भारत रेल्वेची मागणी वाढत आहे. वेगवान आणि आरामदायी प्रवासाच्या सुविधेमुळे अल्पवधीत ही ट्रेन प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे.

महाराष्ट्रातील सात मार्गावर वंदे भारत -

  1. महाराष्ट्रात सात मार्गांवर वंदे भारत रेल्वे सुरु आहे. 
  2. पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते गांधीनगर दरम्यान ३० सप्टेंबर २०२२ मध्ये सुरु झाली. 
  3. नागपूर बिलासपूर वंदे भारत ट्रेन डिसेंबर २०२२ मध्ये सुरु झाली. 
  4. मुंबई सोलापूर वंदे भारत पुणे मार्गे सुरू केली.
  5. मुंबई शिर्डी रेल्वेही फेब्रुवारी २०२३ मध्ये सुरु करण्यात आली. 
  6. मुंबई मडगाव आणि नागपूर-इंदूर जून महिन्यात सुरु झाली. 
  7. त्यानंतर डिसेंबर महिन्यात मुंबई जालना ही रेल्वे सुरु झाली. 

मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला मोठा झटका; फॅक्ट चेकसंदर्भातील IT नियमांमधील २०२३ च्या दुरुस्त्या रद्द

राज्यात वंदे भारत एक्प्रेसचा विस्तार केला जात नाही. नवीन नवीन मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. महाराष्ट्रात आणखी सात मार्गावर वंदे भारत एक्प्रेस धावणार आहे. त्यात मुंबई अहमदाबाद, मुंबई शेगाव, पुणे शेगाव, पुणे बेळगाव, पुणे बडोदा, पुणे-सिंकदराबाद, मुंबई कोल्हापूर या मार्गांचा समावेश आहे. येत्या वर्षभरात या सर्व मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. 

Whats_app_banner