मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PM Modi In Mumbai : पीएम नरेंद्र मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात, म्हणाले...

PM Modi In Mumbai : पीएम नरेंद्र मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात, म्हणाले...

Feb 10, 2023 07:18 PM IST

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानंतर मोदींनी मराठीतून जोरदार भाषण केलं आहे.

PM Narendra Modi Mumbai Visit
PM Narendra Modi Mumbai Visit (HT)

PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी मराठीतून संवाद साधला. देशातील रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती होत असून नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन देशाला समर्पित करताना मला आनंद होत असल्याचं मोदींनी मराठीतून केलेल्या भाषणात सांगितलं आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते.

वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर उपस्थितांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वंदे भारत ट्रेन हे आजच्या आजच्या आधुनिक भारतासाठी प्रचंड अभिमानास्पद चित्र आहे. भारताचा वेग आणि स्केल या दोन्ही गोष्टींचं प्रतिक वंदे भारत एक्स्प्रेस असल्याचं मोदींनी सांगितलं. आतापर्यंत १० वंदे भारत एक्स्प्रेस देशभरात सुरू झाल्या असून देशातील १७ राज्यातील १०८ जिल्ह्यांमध्ये वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्याचं पीएम मोदी म्हणाले. देशातील अनेक राज्यांमध्ये आधुनिक रेल्वेचं जाळं उभारण्यात येत असून नवे विमानतळ आणि बंदरंही तयार करण्यात येत आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच १० लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी देण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांशी बोलताना सांगितलं.

ट्रेंडिंग न्यूज

वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पीएम नरेंद्र मोदी हे मरोळमधील एका कार्यक्रमासाठी दाखल झाले आहेत. मुंबईच्या मरोळमध्ये दाऊदी बोहरा समाजाच्या सैफी अकादमी या शिक्षण संस्थेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळं आता या कार्यक्रमात मोदी काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची भाजपनं जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच मोदी पालिका निवडणुकांविषयी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

WhatsApp channel