लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आज मुंबईत पार पडली. लोकसभा जागांसाठी घटक पक्षांमध्ये जवळपास सर्व जागांवर सहमती बनवण्याचा प्रयत्न केला गेला. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने २७ मतदारसंघात तयारी केल्याचे सांगत या मतदारसंघाची यादी दिली तसेचचार प्रमुख मागण्या केल्या आहेत. यात जालना मतदारसंघातूनमनोज जरांगे पाटील यांना तर पुण्यातून डॉ. अभिजीत वैद्य यांना सर्वसामान्य उमेदवार म्हणून उमेदवारी द्यावी, ही पहिली मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने त्यांनी तयारी केलेल्या २७ लोकसभा मतदारसंघाची यादी दिली. अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, उस्मानबाद, औरंगाबाद, बीड, सोलापूर, सांगली, माढा, रावेर, दिंडोरी, शिर्डी, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, रामटेक, सातारा, नाशिक, मावळ, धुळे, नांदेड, बुलढाणा, वर्धा या जागांचा प्रस्ताव वंचितने दिला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी जालन्यातून जरांगे यांना उमेदवारी देण्याची मागणी महाविकास आघाडीच्या बैठकीत केली आहे. यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले प्रकाश आंबेडकर खरा माणूस आहे, त्यांनी मत मांडले यावर मी आताच बोललं पाहिजे असं नाही. माझा मालक माझा समाज आहे. आमचा अजेंडा राजकारण नाही. प्रकाश आंबेडकर आधीपासून आमच्यासोबत आहेत, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता,ते खरे माणूस आहेत, त्यांची मराठा समाजात क्रेझ आहे, ते ग्रेट आहेत, पण सध्या आमचा फोकस फक्त आरक्षणावर आहे, असं म्हणत जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या प्रस्तावाला नकार दिला आहे.
संबंधित बातम्या