मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  VBA in Maha Vikas Aghadi : मोठी बातमी! वंचित बहुजन आघाडीला अखेर महाविकास आघाडीत स्थान

VBA in Maha Vikas Aghadi : मोठी बातमी! वंचित बहुजन आघाडीला अखेर महाविकास आघाडीत स्थान

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 30, 2024 06:55 PM IST

Vanchit Bahujan Aghadi News : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास महाविकास आघाडी अखेर राजी झाली आहे.

Vanchit Bahujan Ahgadhi in Maha Vikas Aghadi
Vanchit Bahujan Ahgadhi in Maha Vikas Aghadi

Vanchit Bahujan Aghadi with Maha Vikas Aghadi : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला अखेर महाविकास आघाडीत स्थान मिळालं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमतानं हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय प्रकाश आंबेडकर यांना पत्राद्वारे कळवण्यात आला आहे.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे महाविकास आघाडीसोबत जाणार का आणि महाविकास आघाडीतील पक्ष त्यांना स्थान देणार का हा गेल्या वर्षभरापासून चर्चेचा विषय होता. प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा निर्वाणीची भाषा वापरून महाविकास आघाडीला इशारा दिला होता. त्यामुळं नेमकं काय होणार याविषयी उत्सुकता होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. तिथं अंतिम निर्णय झाला.

Hemant Soren : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरातून ३६ लाखांची रोकड व बीएमडब्लू कार जप्त

तुटता-तुटता जुळलं!

या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यात आलं होतं. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांना बैठकीसाठी पाठवलं होतं. पुंडकर यांनी वंचितचा अजेंडा आघाडीच्या नेत्यांसमोर ठेवला. त्यावर चर्चा करून सांगतो असं त्यांना सांगण्यात आलं.

त्यानंतर जवळपास तासभर त्यांना बाहेर बसवण्यात आलं. त्यामुळं संतापलेले पुंडकर बाहेर पडले आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली. आम्हाला बैठकीला बोलावून अपमान करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळं आता सारं काही फिसकटल्याची चर्चा असतानाच वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झाल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील (Jayant Patil), शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. या तिन्ही नेत्यांच्या सहीचं पत्र प्रकाश आंबेडकर यांना पाठवण्यात आलं व त्यांना महाविकास आघाडीत सहभागी होण्याची विनंती करण्यात आली.

Pankaja Munde : राज्यसभेची निवडणूक जाहीर होताच पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा

प्रकाश आंबेडकरांना पाठवण्यात आलेल्या पत्रात आहे काय?

'देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिलं. व्यक्तीस्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवलं जात आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीनं वेगळा निकाल लावला तर बहुधा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावं, यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीनं यापुढं अधिकृतपणं महाविकास आघाडीत सामील व्हावं, अशी आमची भूमिका आहे, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंबेडकरांना पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

WhatsApp channel