Somnath Suryavanshi: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्युचं खरं कारण काय? प्रकाश आंबेडकरांनी शेअर केला पोस्टमॉर्टेम रिपोर्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Somnath Suryavanshi: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्युचं खरं कारण काय? प्रकाश आंबेडकरांनी शेअर केला पोस्टमॉर्टेम रिपोर्ट

Somnath Suryavanshi: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्युचं खरं कारण काय? प्रकाश आंबेडकरांनी शेअर केला पोस्टमॉर्टेम रिपोर्ट

Dec 16, 2024 06:40 PM IST

Prakash Ambedkar On Somnath Suryavanshi Death: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा शवविच्छेदनाचा अहवाल सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट शेअर केला
प्रकाश आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट शेअर केला

Prakash Ambedkar News: परभणीत एका अज्ञात व्यक्तीने संविधानाचा अवमान केल्यानंतर शहर आणि जिल्ह्यात हिंसाचार उसळला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. परंतु, यातील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याने सोमनाथचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी याच्या शवविच्छेदनाचा अहवाल सोशल मीडियावर शेअर केला आहे.

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. त्यानंतर बुधवारी परभणी शहर आणि जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेर्धात नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केली. परिस्थिती परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले, ज्यात सोमनाथ सूर्यवंशी याचाही समावेश होता. परंतु, सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यात खळबळ माजली. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदला बीड, परभणी, नांदेड, कोल्हापूर आणि नांदेडमध्ये बंदला मोठा प्रतिसाद मिळाला.

सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी त्याचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला . शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झालेल्या जखमा आणि अटॅकमुळे झाल्याचे नमूद करण्यात आले. दरम्यान, सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्युला जबाबदार असलेल्या पोलिसांना निलंबित करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदेंनी केली.

परभणीसह आसपासच्या जिल्ह्यात सोमवारी सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले. मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरी देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशीही मागणी केली जात आहे.

सोमनाथ हा परभणी शहरातील शंकरनगर भागात भाड्याची खोलीत राहत होता. तो काद्याचेही शिक्षण घेत होता. सोमनाथ सूर्यवंशी हा कट्टर आंबेडकरी कार्यकर्ता होता. त्याच्या मृत्युमुळे राज्यात बंदची हाक देण्यात आली. या बंददरम्यान दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. परभणी शहरासह मोंढा नानलपेठ, जिंतूर, गंगाखेड अशा सर्व पोलीस ठाण्यात ५०० हून अधिक जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर