‘त्याला वाल्मिक कशाला म्हणता, तो २० खून करणारा वाल्या’; जितेंद्र आव्हाडांचा संताप, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘त्याला वाल्मिक कशाला म्हणता, तो २० खून करणारा वाल्या’; जितेंद्र आव्हाडांचा संताप, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

‘त्याला वाल्मिक कशाला म्हणता, तो २० खून करणारा वाल्या’; जितेंद्र आव्हाडांचा संताप, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

Dec 28, 2024 03:47 PM IST

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत वाल्मिक कराडवरही गंभीर आरोप केले. त्याला वाल्मीक काय म्हणता तो २० खून करणारा वाल्या असल्याचंआव्हाड यांनी म्हटलंय.

जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे कथित निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांचं नाव मुख्य आरोपी म्हणून समोर येत आहे. वाल्मिक कराड यांच्या अटकेसाठी बीड जिल्ह्यात आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार जितेद्र आव्हाड यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आमदार, खासदार सहभागी झाले होते. या मोर्चावेळी माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत वाल्मिक कराडवरही गंभीर आरोप केले. यांच्यासारख्यामुळे आमची जात बदनाम होतेय,  त्याला वाल्मीक काय म्हणता तो २० खून करणारा वाल्या असल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय.

 आव्हाड म्हणाले की, बीडमध्ये सर्व जातीच्या लोकांनी प्रतिनिधित्व केलं मात्र कधी जात शिवली नाही. हा शिवराज बांगर याला कोण कोण ओळखता. याचं घरचं हायकोर्ट झालं आहे. बापू आंधळेचा खून कोणी केला. पोलीस प्रशासन व इथल्या पालकमंत्र्यांनी बीड जिल्ह्याचा सत्यानाश  केला. 

जर अशोक सोनवणे यांची ॲट्रॉसिटीची तक्रार त्याच दिवशी दाखल झाली असती तर संतोष मेला नसता. आंधळे खून प्रकरणाचा तपास करणारा महाजनच याही केसमध्ये आहे. जर तुम्ही इथला एकही अधिकारी धनंजय मुंडे यांना विचारता न आणणार नसाल तर कसं होईल. संतोष मेल्यानंतर तुम्ही जागे झालात, अगोदर का नाही? असा सवालही आव्हाड यांनी केला.

वाल्मिक कराड हा नरभक्षक वाघ कसा असतो, तसा नरभक्षक वाल्मिकी आहे. त्याच्या जिभेला रक्त लागलं आहे. खरं तर वाल्मिकी कोणीही म्हणू नका, तो वाल्या आहे. बीडमध्ये अर्ध्याहून अधिक खून वंजाऱ्यांचेच झाले आहेत. आणि ते यांनीच केले आहेत. या वाल्याला कधी पकडणार हे पोलिसांनी सांगायला हवं. आत्तापर्यंत  वंजारा समाजातील लोकांचे २० खून झाले आहेत. यामुळे आमची जात बदनाम होते आहे.  धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा, अशी पहिली मागणी मी केली होती, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर