vaidyanath cooperative sugar factory auction : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या अडचणी वाढतांना दिसत आहे. मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आता लिलावात काढला जाणार आहे. लिलावाची तारीख देखील ठरली आहे. येत्या २५ जानेवारी रोजी ई लिवाव पद्धतीने कारखान्याची बोली लावली जाणार आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने कारखाण्यावरील तब्बल २०३ कोटी ६९ लाख रुपयांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ही लिलावाची प्रक्रिया जाहीर केली आहे. हा कारखाना लोकनेते गोपिनाथ मुंडे यांनी उभारला होता. त्यांचा हा कारखाना प्राण असल्याची धारणा मुंडे समर्थकांची आहे.
परळी वैद्यनाथ सहकारी कारखान्यांवर तब्बल २०३ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज फेडावे या साठी बँकेने त्यांना वारंवार नोटिसा देखील बाजवल्या आहेत. बँकेने लिलावाच्या नोटीसमध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि., अश्रुबा काळे, भाऊसाहेब घोडके, भीमराव तांबडे, दत्तात्रय देशमुख, श्रीनिवास दीक्षितुल्लू आदींच्या नावे ही नोटिस बजावली आहे.
जीएसटी विभागाने देखील वैद्यनाथ कारखान्यास १९ कोटी थकीत असल्याने नोटीस बजावली होती. दरम्यान, ही रक्कम लोकवर्गानीतून गोळा करण्याची तयारी नागरिकांनी दर्शवली होती. मात्र, याला पांकजा मुंडे यांनी नकार दिला होता. मात्र, आता ही मोठी थकीत रक्कम वसूली साठी आता बँकेने थेट कारखाना लिलावांची प्रक्रिया सुरू केली आहे. कारखान्यावर छत्रपती संभाजीनगर येथील युनियन बैंक ऑफ इंडियाच्या उस्मानपुरा शाखेचे दोन वर्षांपासून २०३ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहेत. या रकमेवरील व्याज आणि इतर कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी बँकेने ई लिलाव जाहीर केला आहे. ही प्रक्रिया २५ जानेवारीला सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.
दरम्यान, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेला हा करखाना लिलावात निघणार असल्याने पंकजा मुंडे या अडचणीत सापडल्या आहेत. या कारखान्यात गोपिंनाथ मुंडे यांची समाधी तसेच स्मारक उभारण्यात आले आहे. त्यांनी मारठवड्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा कारखाना उभारला होता. मात्र, मोठ्या प्रमाणात कर्ज थकीत असल्याने आता हा कारखाना लिलावात निघणार आहे.