Mumbai Local Trains: नव्या वर्षाच्या सुरुवातीलच उरणकरांच्या आनंदात भर पडली. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरण- खारकोपर लोकल सेवा अखेर सुरू झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उरण स्थानकांत हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी रेल्वे स्थानक आणि उरण स्थानक ते खारकोपर स्थानकादरम्यान प्रथम धावणारी लोकल ट्रेन फुलांच्या माळांनी सजवण्यात आली.
उरण स्थानकाची फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली. तर, रेल्वे विभागाने विविध प्रकारच्या स्वागताचे फलक लावण्यात आले. गुरुवारपासूनच कार्यक्रमासाठी स्टेज तयार करण्यात आला होता. शहरातील अनेक नागरिक सकाळ पासूनच उरण रेल्वे स्थानकात येऊ लागले.
गेल्या अनेक दिवसांपासून उरण शहरात मुंबई लोकल सेवा पुरवण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला होता. यानंतर मुंबई लोकल प्रशासनाने बेलापूर उरण अशी लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. अखेरच सीएसएमटी ते उरण लोकल सेवा सुरु झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
बेलापूर ते उरणदरम्यान लोकल सेवा सुरु झाल्याने प्रवाशांचा खूप वेळ वाचणार आहे. नवी मुंबईच्या स्थापनेनंतर अनेक दशकांपूर्वी सीएसएमटी ते बेलापूर लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र, बेलापूरपासून उरण असा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. अशा प्रवाशांच्या आनंदात भर पडली आहे.
संबंधित बातम्या