Uran Murder : उरण येथे काही दिवसांपासून एक तरुणी बेपत्ता होती. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. या तरुणीचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत सापडला आहे. या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्येपूर्वी तरुणीच्या गुप्तांगावर मारहाण करण्यात आली. ऐवढेच नाही तर आरोपीने तिचे हात, पाय, आणि स्तन कापले. तिच्या मृतदेह पाहून सगळेच हादरले. तरुणीची हत्या ही प्रेमप्रकरणातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेची हकिकत अशी की, उरण शहरातील एन आय स्कूलच्या जवळील राहणारी ही तरुणी गुरुवारपासून बेपत्ता होती. या प्रकरणी पोलीसांत तक्रार देण्यात आली होती. पोलिस या तरुणीचा शोध घेतळ असतांना कोटनाका परिसरात शनिवारी सकाळी तिचा मृतदेह आढळला. तरुणीला वाईट पद्धतीने ठार मारण्यात आले होते. तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. तर तिचे हात, पाय, स्तन देखील कापून टाकण्यात आले होते.
पोलिसांनी या तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला. हल्लेखोर हा मृत तरुणीचा प्रियकर असल्याचा संशय आहे. तो उत्तर प्रदेशमधील असून सध्या तो फरार झाला आहे. तो गावी गेला असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, त्यानेच हत्या केली हे अद्याप सिद्ध झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक पोलिस ठाण्यासमोर जमले होते. पोलिस ठाण्यासमोर काही काळ तणाव निर्माण झाला होता. आरोपीचं नाव दाऊद शेख असल्याची देखील माहिती आहे.
चारित्र्याचा संशय घेऊन पतीने दिलेल्या त्रासामुळे एका महिलेने स्वयंपाकघरातील चाकूने स्वत:ला भोसकून घेत आत्महत्या केली. पुण्यातील मंगळवार पेठेत ही घटना असून तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. पूजा उर्फ सोनल विकी कांबळे (वय ३३, रा. बोलाईखाना, मंगळवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर पूजाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विकी शंकर कांबळे (वय ३८) याला अटक करण्यात आली. पती हा पत्नीच्या चारित्र्यावर नेमहि संशय घ्यायचा. यामुळे पत्नी ही कंटाळली होती.
संबंधित बातम्या