मला IAS व्हायचंय; ८ वीत असतानाच ध्येय निश्चित, उत्तुरच्या वृषाली कांबळेकडून अवघ्या २३ व्या वर्षी UPSC क्रॅक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मला IAS व्हायचंय; ८ वीत असतानाच ध्येय निश्चित, उत्तुरच्या वृषाली कांबळेकडून अवघ्या २३ व्या वर्षी UPSC क्रॅक

मला IAS व्हायचंय; ८ वीत असतानाच ध्येय निश्चित, उत्तुरच्या वृषाली कांबळेकडून अवघ्या २३ व्या वर्षी UPSC क्रॅक

Published Apr 17, 2024 06:50 PM IST

UPSC Success Story kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातीलआजरा तालुक्यातीलउत्तूर येथील वृषाली संतराम कांबळे हिने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी व पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली. वृषाली ३१० वी रँक घेऊन आयएएस झाली आहे.

वृषाली कांबळेचं अवघ्या २३ व्या वर्षी UPSC परीक्षेत यश
वृषाली कांबळेचं अवघ्या २३ व्या वर्षी UPSC परीक्षेत यश

Upsc success story :यूपीएससी नागरीसेवा (मुख्य) परीक्षा २०२३ (UPSC CSE 2023)चा अंतिम निकाल १६ एप्रिल रोजी जाहीर झाला. या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील ६ जणांनी यश मिळवले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तूर येथील वृषाली संतराम कांबळे (Vrishali kamble) हिने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी व पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली. वृषाली ३१० वी रँक घेऊन आयएएस झाली आहे.

वृषालीने आयएएस होण्यासाठी घरच्या परिस्थितीशी सामना करीत कठोर मेहनत घेत आपले स्वप्न पूर्ण केले. वृषालीने राज्यशास्तार विषय घेऊन बी.ए केले आहे. मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये तिचे पदवीचे शिक्षण झाले आहे. वृषाली मुंबईत रहात असली तरी तिचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तूर आहे. तिचे वडील कामानिमित्त नेरूळ येथे राहतात.

१५ लाख विद्यार्थ्यांनी यूपीएससीची पूर्व परीक्षा (UPSC pre Exam) दिली होती. यातून वृषाली कांबळेने देशभरातून ३१० वी रँक पटकावली. वृषालीने माध्यमिक शिक्षण नेरुळ येथील सेंट ऑगस्टीन हायस्कूलमध्ये फोर्ट येथील सेंट झिविअर्स कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले.

वयाच्या १४ व्या वर्षीच ध्येय केले निश्चित -

वृषालीने सांगितले की, तिने आठवीत असतानाच आय.ए.एस. होण्याचे ध्येय निश्चित केले होते. त्यामुळे तिने माध्यमिक शिक्षण घेत असतानाच सामान्य ज्ञानाची पुस्तके वाचण्यास सुरूवात केली. तिला दहावीला व बारावीच्या बोर्ड परीक्षेत ९० टक्केहून अधिक गुण मिळूनही तिने इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला प्रवेश घेतला नाही. तर तिने आपले आयएएसचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कला शाखेत प्रवेश घेऊन राज्यशास्त्रातून पदवी संपादन केली. हा विषय घेऊनच ती आता आयएएस झाली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापूरचे सहा विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. त्यात आशिष पाटील यांनी १४७ वी रँक प्राप्त करून तिसऱ्यांदा यशाची कमान सर केली आहे. आशिष पाटील सध्या दिल्ली, दीव- दमन या केंद्रशासित प्रदेशात उपजिल्हाधिकारी पदावर काम करत आहेत.

यापूर्वी त्यांनी २०२२ मध्ये ४६३, तर २०२१ मध्ये ५६३ व्या रँकनं यश मिळवलं होतं. आता त्यांनी १४७ वी रँक मिळवली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर