UPSC Aspirant Died by Suicide in Delhi : राज्यात सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलंहा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या देशात पूजा खेडकर प्रकरण, दिल्लीतील कोचिंग सेंटर येथे पाणी घुसल्याने झालेल्या तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांना आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉस्टेलचालक पैशांसाठी तगादा लावत असल्याने महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील यूपीएससीची तयारी करणाऱ्या एका तरुणीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिने चिठ्ठी लिहिली असून त्यात तिने परीक्षा आणि खर्चाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचं लिहिले आहे.
अंजली अनिल गोपनारायण असे या तरुणीचे नाव असून ती अकोल्यात गंगानगर भागात राहत होती. तिने दिल्लीत शनिवारी हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजलीच्या मृत्यूमुळे दिल्लीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची होणाऱ्या फसवणुकीचा आणि पिळवणुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने गंभीर बाबींवर प्रकाश टाकला आहे. परीक्षेचा अभ्यासाचा तणाव, शिकवणी वर्गाचा खर्च, घर मालकांनी तसेच वस्तीगृह चालकांनी वाढवलेले भाडे व घर शोधून देणारी दलाले यांच्याकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीवर तिने प्रकाश टाकला आहे.
अंजलीने लिहिलेल्या सुसाइड नोट मध्ये तिने आई बाबांची माफी मागितली आहे. “आई-बाबा मला माफ करा. मी आता आयुष्याला कंटाळले आहे. माझ्यासमोर फक्त समस्या आणि समस्याच आहेत. मला आता शांततेची गरज आहे. या नैराश्येतून मुक्त होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण मी नैराश्येतून मुक्त होऊ शकले नाही. त्यावर मात करू शकले नाही. पीजी आणि होस्टेल मालक विद्यार्थ्यांकडून फक्त पैसे उकळत आहेत. प्रत्येकाला हा खर्च परवडू शकत नाही. मी खूप प्रयत्न केले परंतु पुढे जाऊ शकली नाही. सुसाईट नोटमध्ये अंजलीने तिच्या मावशीला देखील धन्यवाद दिले आहे. तिने तिला नेहमी साथ दिली. सुसाइड नोटमध्ये एक स्माईली काढत तिने आत्महत्या हे कोणत्याही समस्येचे समाधान नाही. पीजी आणि होस्टेलचे भाडे कमी करावे, कारण अनेक विद्यार्थी हे ओझे सहन करू शकत नाहीत. असे आवाहन देखील केले आहे. तिने तिच्या सर्व मित्र आणि कुटुंबियांना धन्यवाद दिले आहे.
अंजली ही दिल्लीच्या जुन्या राजिंदर नगरमध्ये नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होती. पहिल्याच प्रयत्नात तिला यशस्वी व्हायचे होते. तिने लिहिल्या नोटमध्ये म्हटले आहे की, पहिल्याच प्रयत्नात मला परीक्षा पास व्हावी असे वाटत होते. पण मी चंचल आहे ते सर्वांना माहितेय. कृपया सरकारी परीक्षांमधील घोटाळे कमी करा व रोजगार निर्माण करा. नोकरीसाठी अनेक तरुण धडपडत आहेत असे देखील तिने सुसाइत नोटमध्ये लिहिले आहे. यासोबतच पीजी आणि वसतिगृहाचे भाडेही कमी करावे असे तिने म्हटलं आहे. येथील लोक मुलांकडून पैसे लुटत आहेत.