Thane Suicide News: ठाणे शहरात एका २८ वर्षीय यूपीएससीची तयारी करणाऱ्या एका तरुणाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना वर्तक नगर परिसरात शनिवारी (७ सप्टेंबर २०२४) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. नैराश्यातून संबंधित व्यक्तीने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ठाणे येथील वर्तक नगर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, मृत व्यक्तीच्या घरात एक 'सुसाइड' नोट सापडली आहे. यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकल्याने तो नैराश्यात होता. यातूनच त्याने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले, असा पोलिसांना संशय असेल. त्याने शनिवारी रात्री गृहसंकुलाच्या आठव्या मजल्यावरून उडी घेतली. त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. वर्तक नगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या सुसाईट नोटमध्ये असे लिहिण्यात आले होते की, ‘माझे या जगात जगणे कठीण झाले आहेत. आई, पप्पा, दादा मला माफ करा. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. माझ त्यांच्यावर प्रेम आहे. माझ्या मृत्युला कोणीही जबाबदार नाही.’
मध्य प्रदेशातील इंदूर येथील पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या बहुमजली इमारतीवरून उडी मारून एका ३२ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. आझाद नगर परिसरातील पीटीसीच्या कॅम्पसमध्ये शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. सहाय्यक पोलिस आयुक्त आशिष पटेल यांनी सांगितले की, पीटीसीमध्ये सुभेदार (सब-इन्स्पेक्टर लेव्हल ऑफिसर) म्हणून कार्यरत असलेल्या नेहा शर्माने संस्थेच्या कॅम्पसमधील पाच मजली निवासी इमारतीच्या गच्चीवरून उडी मारली. हे टोकाचे पाऊल कशामुळे उचलले गेले हे अद्याप समजू शकले नसून या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पीटीसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शर्मा या काही दिवसांपूर्वीच प्रसूती रजा संपवून पुन्हा नोकरीवर रूजू झाले होते.