Maharashtra Weather Update : राज्यातला पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील काही दिवस राज्यात काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. असे असले तरी पावसाची तीव्रता कमी असल्याने आज असा कोणताही अलर्ट हवामान विभागाने जारी केलेला नाही.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार कोकण गोव्यामध्ये पुढील पाच ते सात दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये पुढील चार दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस काही ठिकाणी तर मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण गोव्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा व विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज संपूर्ण राज्यांमध्ये कुठेही अलर्ट दिलेला नाही.
पुणे महासपासच्या परिसरात पुढील पाच ते सात दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या एक दोन सरी पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील घाट विभागात काही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. असे असले तरी घाट विभागाला देखील कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
यावर्षी राज्यात चंगला पाऊस झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सरासरी पेक्षा जास्त पाऊस हाल आहे. राज्यात एकंदर पडणाऱ्या पावसाच्या सरासरीच्या तुलनेत २७ टक्के पाऊस झाला आहे. तर देशात सरासरीच्या तुलनेत ५ टक्के जास्त पाऊस झाला आहे. सध्या देशात पावसाने विश्रांती घेतली आहे. या महिनाअखेरीस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.