Pune Porsche Accident: पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी विशाल अग्रवाल यांचे वडील म्हणजेच अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमारला पुणे पोलिस क्राइम ब्रांचने आज पहाटे ३ वाजता अटक केली. दोन दिवसांपूर्वी त्यांची चौकशीसाठी बोलण्यात आल होतं. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांना अटक केल्यावर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सुरेन्द्र अगरवाल यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात अनेक महत्वाचे धागेदोरे पुणे पोलिसांचीहा हाती लागले असल्याची माहिती आहे.
पुण्यातील बिल्डरविशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत अलिशान पोर्शे कार २०० च्या वेगाने चालवून दोन जणांचा जीव घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची रवानगी बालसुधार गृहात केली आणि पोलिसांनी विशाल अगरवालवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. दरम्यान, आरोपीचे वडील विशाल आगरवाल याला न्यायालयाने शुक्रवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. यानंतर आज सकाळी सुरेन्द्र कुमार यांना अटक करून त्यांच्या घरावर छापा घालण्यात आला आहे.
कल्याणी नगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक अगरवाल यांनी धमकावून डांबून ठेवल्याची फिर्याद मोटर चालक गंगाधर पुजारी यांनी येरवडा पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक करण्यात आली.
अपघातानंतर अगरवाल कुटुंबियांच्या बंगल्यातील सीसीटिव्हीत छेडछाड केल्याचे पोलिस तपसात आढळले आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांचे पथक तपास करत आहे.
अपघात घडल्यानंतर या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यात सुरेन्द्र अगरवाल याने ड्रायव्हरवर हा गुन्हा स्वत:वर घेण्यासाठी दबाव टाकला होता. या ड्रायव्हरला हा गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. चालकाने दिलेल्या जबाबात याचा खुलासा करण्यात आला होता. आज पहाटे ३ च्या सुमारास सुरेंद्रकुमार अग्रवाल याला पोलिसांनी अटक केली. पुराव्यांशी छेडछाड करण्याचा आणि गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न केल्याने सुरेन्द्र कुमार याला अटक करण्यात आली आहे.