Maharashtra weather update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हवामानात चढ आणि उतार पाहायला मिळाले आहे. विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि थंडी वाढली होती. आता पुन्हा राज्यातील हवामानात बदल होत आहे. पुढील काही दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात हवामान बदल होणार असल्याची माहिती पुणे वेध शाळेने दिली आहे. सध्या पश्चिमी विक्षोभ म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स पंजाब वरून पूर्वेकडे जात आहे. एक द्रोणिका रेषा उत्तर ओडिषा ते उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत आहे. या दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळे राज्यातील हवामानावर परिमाण होणार आहे. पुढील काही दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. तर थंडीत किंचित वाढ होऊन त्यानंतर तापमानात हळू हळू वाढ होणार आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पश्चिमी विक्षोभ म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स पंजाब वरून पूर्वेकडे जात आहे. एक द्रोणिका रेषा उत्तर ओडिषा ते उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत आहे. दोन वेस्टर्न डिस्टर्बन्सिस म्हणजे पश्चिम १० व १२ तारखेच्या संध्याकाळी पश्चिम हिमालयाला प्रभावित करणार आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या प्रती चक्रवतीय वाऱ्यांबरोबर आग्नेय व दक्षिणी वाऱ्यांबरोबर आर्द्रता राज्याच्या आग्नेय भागात येत आहे. यामुळे पुढील काही दिवस राज्याच्या संपूर्ण भागात पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहणार आहे.
राज्याच्या आग्नेय भागात म्हणजे विदर्भ व आजूबाजूच्या भागात थोडी आर्द्रता असेल. त्यामुळे राज्याच्या उत्तर मध्य भागात उत्तरी वाऱ्यांमुळे किमान तापमानात येते २४ तासात घट होण्याची शक्यता आहे. दहा तारखे नंतर मात्र किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात पुढील पाच ते सात दिवस फारसा बदल होणार नाही. मात्र, किंचित वाढवण्याची शक्यता आहे.
पुणे व आजूबाजूच्या परिसरात येत्या २४ तासात आकाश निरघळ राहील ११, १२ व १३ तारखेला आकाश मुख्यतः निरभ्र राहील. किमान तापमानात येत्या २४ तासात घट होण्याची शक्यता आहे. १० तारखे नंतर दोन ते तीन दिवस किमान तापमानात जवळजवळ दोन डिग्री सेल्सिअसणे वाढवण्याची शक्यता आहे. पुढील पाच-सहा दिवस कमाल तापमानात मात्र फारसा बदल होणार नाही. मात्र किंचित वाढवण्याची शक्यता आहे.