Unseasonal Rain in Nagpur : विदर्भात नागपूर, गडचिरोली, वर्धा येथे हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला. शनिवारी आणि रविवारी नागपूर आणि परिसरात वेगाने वारे वाहून काही वेळ गारपीट झाली. वाऱ्याच्या वेगामुळे काही झाडे देखील उन्मळून पडली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. या पावसामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान झाले.
नागपूर येथे शनिवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. शहरात आणि ग्रामीण भागात काही कालावधीत झालेल्या गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दाणादाण उडाली. शहरात झाडपडीच्या देखील घटना घडल्या. तर कळमना कृषि उत्पन्न धान्य बाजारात वाळत घातलेले उघड्यावर असलेले धान्य भिजले. यामुळे नुकसान झाले.
तर उन्हाळी पिकांचे देखील नुकसान झाले. सुमारे अर्धा तास पावसाचे थैमान सुरू होते. वारा आणि वीजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरीमुळे अनेक झाडे उमळून रस्त्यावर पडली काही झाले ही वाहनांवर पडल्याने त्यांचे देखील नुकसान झाले. काही सखोल भागात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले तर काही घरात पाणी गेल्याने नागरिकांचे हाल झाले.
बाबरातील गहू, सोयाबीन, धान, तूर, चना, मिरची हा माल भिजल्याने नुकसान झाले. ग्रामीण भागात गारपिटीमुळे शेतमालाचे देखील नुकसान झाले. पुढील दोन दिवस विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज नागपूरसह, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी तसेच बाजार समितीती असलेला माल योग्य पद्धतीने ठेवण्याचे आवाहन नागपूर प्रादेशिक हवमान विभागाने केले आहे.