मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra rain : राज्यात अवकाळीचे २ बळी, वीज अंगावर पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू, गारपिटीने फळबागांचे नुकसान

Maharashtra rain : राज्यात अवकाळीचे २ बळी, वीज अंगावर पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू, गारपिटीने फळबागांचे नुकसान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 12, 2024 10:43 PM IST

Unseasonal Rain in Marathwada : आज अवकाळीने दोन बळी घेतले आहेत. वीज अंगावर पडून दोन जणांचा मृत्यू झाला. शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळल्याने (rain lighting) त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मराठवाड्यात वीज अंगावर पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
मराठवाड्यात वीज अंगावर पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील (Unseasonal Rain in Marathwada) अनेक जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने झोडपून काढले. पावसाने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाने व गारपिटीने फळबागांसह शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (chhatrapati sambhaji nagar) २ दिवसांपासून पावसाने कहर केला असून आज अवकाळीने दोन बळी घेतले आहेत. वीज अंगावर पडून दोन जणांचा मृत्यू झाला. शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळल्याने (rain lighting)  त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे २ जणांचा मृत्यू झाल्याची पहिली घटना घडली आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतकरी हवालदील झाला आहे. हाता तोंडाशी आलेले पिक अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहे. रब्बीसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे. जावेद शेख (वय ६०) आणि सुधाकर धोंडीराम पाचे (वय २५) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गुरूवार आणि शुक्रवारी सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील अंबड टाकळी गावात शुक्रवारी दुपारी शेतात काम करत असणाऱ्या एका ६० वर्षीय व्यक्तीवर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. जावेद शेख असं मृताचं नाव आहे. दुपारी नेहमी प्रमाणे जावेद शेख शेतामध्ये काम करत होते. पण अचानक वादळी वाऱ्यावर व विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्याच दरम्यान अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.

सिल्लेडमध्येही वीज कोसळल्याची घटना -

दुसरी घटना सिल्लोडच्या उडणगाव शिवारात घडली. सुधाकर धोंडीराम पाचे या २५ वर्षीय तरुणाचा वीज कोसळून मृत्यू झाला. शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. 

बीड जिल्ह्यात फळबांगांचं मोठं नुकसान -

बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले. बीड जिल्ह्यातील वडवणी, धारूर, गेवराई यासह जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली. गारांच्या वर्षावामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांसह अन्य पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. बीड जिल्हा सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस बरसल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. वादळी वाऱ्याने अनेक घरावरील टीनची पत्रे उडून गेली. गारांमुळे फळबागायतदार अडचणीत आले आहेत. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

IPL_Entry_Point