उन्नती संस्थेचा शनिवारी दशवार्षिक सोहळा, मिलिंद बोकील यांचे व्याख्यान
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उन्नती संस्थेचा शनिवारी दशवार्षिक सोहळा, मिलिंद बोकील यांचे व्याख्यान

उन्नती संस्थेचा शनिवारी दशवार्षिक सोहळा, मिलिंद बोकील यांचे व्याख्यान

HT Marathi Desk HT Marathi
Published Apr 25, 2025 06:42 PM IST

उन्नती शिक्षण संस्थेने दहा वर्षे पूर्ण केली असून या निमित्ताने दशवार्षिक सोहळ्याचे आयोजन ठाणे येथे करण्यात आले आहे.

मिलिंद बोकील
मिलिंद बोकील

विदर्भातील आदिवासी भागात शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या उन्नती शिक्षण संस्थेने दहा वर्षे पूर्ण केली असून या निमित्ताने दशवार्षिक सोहळ्याचे आयोजन ठाणे येथे करण्यात आले आहे.

यानिमित्ताने "आदिवासी जीवनातील ज्ञान परंपरा आणि लोकजीवन" यावर एक परिसंवाद आयोजित केला असून त्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ व लेखक डॉ. मिलिंद बोकील तसेच लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ श्रीकृष्ण काकडे हे वक्ते म्हणून उपस्थित राहतील.

यावेळी भाषा प्रदर्शनी, पुस्तक प्रकाशन आदी कार्यक्रमही होणार आहेत. साडेपाच ते आठ या दरम्यान ठाणे रहेजा गार्डन क्लब हाऊस येथे हा कार्यक्रम होणार आहे. तो सर्वांना खुला आहे.

शनिवारी (२६ एप्रिल २०२५) रोजी सायंकाळी ५ ३० ते ८ या वेळेत क्लब हाउस, रहेजा गार्डन सोसायटी, लाल बहादूर शास्त्री (LBS) मार्ग, टीप TOP प्लाझा समोर, ठाणे पश्चिम, येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मिलिंद बोकील यांचा अल्प परिचय -

मिलिंद बोकील हे मराठी लेखक, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषांतून लेखन केले आहे. बारावीनंतर ते जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीशी जोडले गेले. त्यांच्या 'छात्र युवा संघर्ष वाहिनी‘त ते काम करत होते.

मिलिंद बोकील यांची पहिली कथा त्यांनी वयाच्या २१व्या वर्षी लिहिली. ’पुन्हा सूर्य, पुन्हा प्रकाश‘ ही ती कथा. ती १९८१ मध्ये किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध झाली. ती पुष्कळ गाजली.

मिलिंद बोकील यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांचा डॉक्टरेटसाठीचा ’कातकरी - विकास की विस्थापन?‘ हा प्रबंध महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागांतील सहकारी पाणी व्यवस्थापनावर आधारित होता. विविध सरकारी समित्यांवर, प्रशिक्षण संस्था व बिगरशासकीय संघटनांमध्ये प्रकल्प साहाय्यक, संशोधन साहाय्यक, प्रकल्प समन्वयक, मुख्य संशोधन अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर