मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात

Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 21, 2024 07:48 PM IST

Ramdas Athawale car accident : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कारला मोठा अपघात झाला आहे.मात्र या अपघातात ते सुखरुप असून दुसऱ्या वाहनाने ते मुंबईला रवाना झाले.

रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात
रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात

Ramdas athawale Car Accident : आरपीआय (आठवले गट) चे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कारला मोठा अपघात झाला आहे. सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात हाअपघात झाला.रामदासआठवले यांची कार खंबाटकी घाटामध्ये दुसऱ्या वाहनाला धडकली.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अपघात झाला. रामदास आठवले साताऱ्याहून मुंबईला येत असताना खंबाटकी घाटात त्यांची कार कंटेनरवर जाऊन आदळला. समोरच्या कंटेनरने अचानक ब्रेक मारल्यामुळे आठवले यांची कार कंटेनरवर आदळली. सुदैवाने या अपघातात रामदास आठवले यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईला रवाना झाले. या अपघातात आठवले यांच्या कारचा पुढचा भाग चेपला आहे.

 

रामदास आठवले २० मार्च रोजी चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापनदिन कार्यक्रमासाठी महाडमध्ये होते. त्यानंतर ते आज महाबळेश्वरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी साताऱ्यात आले होते. गुरुवारी वाईतून मुंबईला जाताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समोरच्या वाहनावर त्यांची गाडी आदळली. यामध्ये रामदास आठवले यांच्या गाडीच्या इंजिनाचे नुकसान झाले आहे. कारमध्ये रामदास आठवले यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सीमा व आईही होती. मात्र सुदैवाने सर्व सुखरुप आहेत.

IPL_Entry_Point