मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amit Shah Sister Dies: केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मोठ्या बहिणीचे मुंबईत निधन

Amit Shah Sister Dies: केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मोठ्या बहिणीचे मुंबईत निधन

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 15, 2024 03:39 PM IST

Amit Shah elder sister Dies In Mumbai: केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या मोठ्या बहिणीचे आज मुंबईत निधन झाले.

Amit Shah
Amit Shah (Mohd Zakir)

Amit Shah Elder Sister Passes Away: केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची मोठी बहीण राजेश्वरी बेन शाह यांचे सोमवारी मुंबईत (Mumbai) निधन झाले. त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला. राजेश्वरी बेन या फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. महिनाभरापूर्वी त्रास वाढल्याने त्यांना अहमदाबादहून मुंबईला हलवण्यात आले. मात्र उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोठी बहीण राजेश्वरीबेन शाह यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अमित शाह यांनी गुजरातमधील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले.

राजेश्वरीबेन शाह यांचे पार्थिव आज त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी थलतेज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशभरातील अनेक नेत्यांनी राजेश्वरीबेन शाह यांना श्रद्धांजली वाहिली.

अमित शाहांचे सर्व कार्यक्रम रद्द

गांधीनगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अमित शाह कार्यकर्त्यांसोबत मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी रविवारपासून अहमदाबादमध्येच होते. सोमवारी ते बनासकांठा आणि गांधीनगर जिल्ह्यातील दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार होते. त्यांच्या हस्ते बनासकांठामधील देवदार गावात बनास डेअरीचे उद्घाटन होणार होते. त्यानंतर दे दुपारी गांधीनगर येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शोकाकुल

"केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भगिनी श्रीमती राजेश्वरीबेन शाह यांचे आज मुंबईत दुःखद निधन झाले. त्यांचे जाणे हे समस्त शाह कुटूंबियांसाठी अत्यंत धक्कादायक आहे. या दुःखात मी व्यक्तिशः सहभागी असून या धक्क्यातून सावरण्याचे बळ आदरणीय अमितभाई आणि समस्त शाह कुटूंबियांना मिळो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. राजेश्वरीबेन शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले.

WhatsApp channel

विभाग