शरद पवारांना Z + दर्जाची सुरक्षा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या कारण-union govt gives z plus security to ncp sp chief sharad pawar ahead of maharashtra assembly election ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शरद पवारांना Z + दर्जाची सुरक्षा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या कारण

शरद पवारांना Z + दर्जाची सुरक्षा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या कारण

Aug 22, 2024 10:41 PM IST

sharad pawar : केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी आढावा घेतल्यानंतर शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार, त्यांना केंद्राची झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत.

शरद पवारांना Z + दर्जाची सुरक्षा
शरद पवारांना Z + दर्जाची सुरक्षा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधी केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने शरद पवारांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याची घोषणा केली आहे. शरद पवारांना जेड प्लस दर्जाची केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची VIP सुरक्षा प्रदान केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या नेतृत्वातील एनसीपीने ८ जागा जिंकल्या होत्या.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे राज्य दौरे सुरू झाले आहेत. शरद पवार अनेक जिल्ह्यांना भेटी देत आहेत. काही महिन्यांपूर्वी पवारांनी मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली होती, त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. त्याचबरोबर आगामी काळात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता.

केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी आढावा घेतल्यानंतर शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार, त्यांना केंद्राची झेड प्लसदर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत. यलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार शरद पवारांना Z+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. या सुरक्षेअंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ५५ सशस्त्र जवानांचे पथक शरद पवारांच्या सुरक्षेत तैनात असेल.

झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचे कारण –

आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात तणावाची स्थिती आहे. केंद्र सरकारने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे दौरे व सभांचा सपाटा लक्षात घेता त्यांची सुरक्षा वाढवली आहे. केंद्रीय एजन्सीने केलेल्या सुरक्षेच्या आढाव्यात शरद पवारांना उच्च दर्जाची सुरक्षा पुरवण्याची सिफारीश केली होती. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (सीआरपीएफ) ला पवारांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आले आहेत.

Z Plus दर्जाची सुरक्षा कायअसते?
यलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार, झेड प्लस श्रेणीतील सुरक्षेमध्ये१० आर्म्ड स्टॅटिक गॉर्ड्स, २४ तास ६ PSO, २४ जवानांची दोन पथके आणि ५ वॉचर्स असतात.केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार सीआरपीएफचे ५५ सशस्त्र जवानांची एक टीम पवारांच्या सुरक्षेत तैनात असणार आहे. केंद्राने पवारांना सीआरपीएफ वीआयपी सुरक्षा विंगची झेड प्लस कव्हर दिले आहे. सीआरपीएफची एक टीम या कामासाठी आधीपासूनच महाराष्ट्रात आली आहे. व्हीआयपी सुरक्षा सुरक्षेचे वर्गीकरण झेड प्लसपासून सुरु होते. त्यानंतरZ, Y, Y आणि  X येतात.

शरद पवार महाविकास आघाडी (एमवीए) चे प्रमुख नेते आहेत. सुरक्षेच्या संबंधित येलो बुकनुसार झड प्लस दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत १० आर्म्ड स्टॅटिक गॉर्ड, ६ पीएसओ एका वेळी राउंड द क्लॉक, २४ जवान २ एस्कॉर्टमध्ये राउंड द क्लॉक, ५वाचर्स२शिफ्टमध्ये असतात. एक पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक इंचार्ज म्हणून तैनात असतात. व्हीआयपींच्या घरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी सहा फ्रीस्किंग आणि स्क्रीनिंग कर्मचारी तैनात असतात. त्याचबरोबर राउंड द क्लॉक ट्रेंड ६ चालकही असतात.