मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar Wadhwan Port : वाढवण बंदरास अखेर केंद्र सरकारची मंजुरी, १२ लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण होणार

Palghar Wadhwan Port : वाढवण बंदरास अखेर केंद्र सरकारची मंजुरी, १२ लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण होणार

Jun 21, 2024 12:18 AM IST

Palghar Wadhwan Port : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील डहाणूजवळील वाढवण येथे ७६,२२० कोटी रुपये खर्चून मोठे बंदर उभारण्यास मंजुरी देण्यात आली. यामध्ये भूसंपादनाच्या खर्चाचाही समावेश आहे.

वाढवण बंदरास अखेर केंद्र सरकारची मंजुरी
वाढवण बंदरास अखेर केंद्र सरकारची मंजुरी

राज्यातील वाढवण (जि. पालघर) बंदर उभारणीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. जगातील १० मोठ्या बंदरापैकी देशातील वाढवण हे एकमेव मोठे बंदर असणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचे राज्याचे बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी म्हटले की, त्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत. सुमारे १२ लाख रोजगार निर्मिती होईल.

वाढवण परिसरामध्ये राहणाऱ्या स्थानिक लोकांना,मत्स्यव्यवसाय करणारे व या व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांचे पुनर्वसन तसेच योग्य तो मोबदला देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कौशल्य विकास कार्यक्रम राबवून रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे. वाढवण बंदरामुळे राज्याचा तसेच स्थानिक नागरिकांच्या आर्थिक विकासाचे नवीन दालन खुले होणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

वाढवण बंदर हे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जे.एन.पी.टी.) व महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त भागिदारीतून होणार आहे. या बंदर प्रकल्पाची किंमत ७६ हजार २०० कोटी रुपये आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा अनुक्रमे ७४ व २६ टक्के आहे. वाढवण बंदराची उभारणी करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले

वाढवण बंदराच्या पर्यावरणीय मंजुरीसाठीचा प्रस्ताव राज्याकडून केंद्राच्या पर्यावरण बदल व वन मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. मात्र त्यानंतरलोकसभानिवडणुकीचे वारे वाहू लागल्याने वाढवण बंदराच्या पर्यावरण मंजुरीचा मुद्दा रेंगाळला होता. आता पुन्हा एनडीएचे सरकार केंद्रावर स्थानापन्न झाल्यामुळे वाढवण बंदराच्या पर्यावरणीय मंजुरीचा विषय डोके वर काढू लागला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढवण बंदराला अखेर मंजुरी मिळाली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील डहाणूजवळील वाढवण येथे ७६,२२० कोटी रुपये खर्चून मोठे बंदर उभारण्यास मंजुरी देण्यात आली. यामध्ये भूसंपादनाच्या खर्चाचाही समावेश आहे.

नाना पटोलेंची टीका -

वाढवण बंदरास पालघर जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांचा तीव्र विरोध असतानाही केंद्रातील मोदी सरकारने तो माथी मारला आहे, असाआरोपकाँग्रेस प्रदेशाध्यक्षपटोले यांनी केला आहे. पटोले कोकण पदवीधर मतदारसंघातील मविआचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ पालघरमधील कार्यकर्ता व पदवीधर मेळाव्यात बोलत होते.

WhatsApp channel