Budget 2024: 'वंदे भारत'बाबत सरकारची महत्त्वाची घोषणा, ४१ हजार नवीन डबे बनवले जात असल्याची माहिती-union budget 2024 nirmala sitharaman on vande bharat train ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Budget 2024: 'वंदे भारत'बाबत सरकारची महत्त्वाची घोषणा, ४१ हजार नवीन डबे बनवले जात असल्याची माहिती

Budget 2024: 'वंदे भारत'बाबत सरकारची महत्त्वाची घोषणा, ४१ हजार नवीन डबे बनवले जात असल्याची माहिती

Feb 01, 2024 01:21 PM IST

Vande Bharat Train: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना वंदे भारत ट्रेनबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.

 Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman

Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करीत आहेत. या बजेटमध्ये तीन महिन्यांसाठी खर्च करायच्या रकमेचा लेखाजोखा मांडण्यात आलेला आहे. या अर्थसंकल्पात वंदे भारत ट्रेनबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधांमध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. वंदे भारत ट्रेनसाठी नवीन ४१ हजार डबे बनवले जात असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.

निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या सुरुवातीच्या घोषणांमध्येच त्यांनी वाहतुकीसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. सरकार सामान्य गाड्यांच्या डबे बदलून वंदे भारत मानक बनवण्याच्या तयारीत आहे. याशिवाय, मेट्रो आणि नमो रेलचा विस्तार इतर शहरांमध्येही करण्यात येणार आहे.

सीतारामन यांनी गुरुवारी सांगितले की, सुमारे ४० हजार रेल्वे डब्यांचे वंदे भारतमध्ये रूपांतर केले जाईल. यासोबतच सरकारने ३ नवीन रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा केली. फ्रेट कॉरिडॉरचे कामही सुरू आहे. गेल्या दहा वर्षांत देशातील विमानतळांची संख्याही वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या देशात १४९ विमानतळे आहेत.

मालदीवसोबतचे तणावपूर्ण संबंध असताना सरकारने अर्थसंकल्पात लक्षद्वीपला मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. लक्षद्वीपसह अनेक बेटांवर पर्यटनासाठी नवीन प्रकल्प जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मालदीव सरकारच्या मंत्र्यांच्या आक्षेपार्ह कमेंटनंतर सोशल मीडियावर मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्यात आला होता, त्यानंतर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने लक्षद्वीपला पोहोचू लागले होते.