दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत भ्रष्ट्राचाराच्या मुद्यावरून चांगलेच फटकारले. काँग्रेस फटकरतांना त्यांचा राग अनावर झाला होता. यावेळी सीतारमण म्हणाल्या, काँग्रेस नेत्यांनी भ्रष्टाचारावर बोलण्यापूर्वी 'डेटॉल'नं तोंड धुवून यावं.
केंद्रीय अर्थ संकल्पावर लोकसभेत काल चर्चा सुरू होती. यावेळी कॉँग्रेसने भाजपच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतरमण बोलत होत्या. कॉँग्रेसने केलेल्या आरोपावरुन त्यांच्या रागाचा पारा अनावर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "तुम्ही (काँग्रेस) भ्रष्टाचारावर बोलत आहात? सीतारमण बिगर भाजप शासित राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींबाबत बोलत होत्या. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांना उद्देशून बोलताना त्या म्हणाल्या की, त्यांनी हिमाचल सरकारला विचारावं की, त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच डिझेलवर ३ रुपयांनी व्हॅट का वाढवला?" फेब्रुवारी २०२३ मध्ये पंजाब सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये ९० पैशांची वाढ केली. या किमती कमी होत नाही. केरळमध्येही त्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील सेस २ रुपयांनी वाढवला. सीतारमण म्हणाल्या की, काही राज्यांनी थोडे पैसे कमी केले आहेत, तर अजुनही अनेक राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवर पैसे कमी केलेले नाहीत.
मंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, पश्चिम बंगालनं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केलेल्या नाहीत, तामिळनाडूनं काही किमती कमी केल्यात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि झारखंडनं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केलेल्या नाहीत. अन्न आणि खतांच्या अनुदानात कपात केल्याचा विरोधकांचा आरोप सीतारमण यांनी फेटाळून लावला.