Mahim Accident News: माहीम आगारात बेस्ट बसखाली चिरडून एका ३० वर्षीय अज्ञात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत व्यक्ती माहीम बस डेपोबाहेर झोपली असताना डेपोतून बाहेर पडलेल्या बसने त्यांना चिरडले. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले आहे. बसचालक निष्काळजीपणामुळे संबंधित व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
यशवंत नांगरे (वय, ५६) असे ताब्यात घेण्यात आलेल्या बसचालकाचे नाव आहे. मााहीम आगाराजवळ एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती माहीम पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एका बसच्या उजव्या चाकाजवळ सुमारे ३० वर्षीय एक अनोळखी व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेली दिसली. पोलिसांनी जखमी व्यक्तीला सायन रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी बसचालक यशवंत नांगरे (वय, ५६) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बसचालक निष्काळजीपणे गाडी चालवत होता आणि रस्त्यावर झोपलेली व्यक्ती त्याला दिसली नाही.
ठाण्यात डंपरने दुचाकीला धडक दिल्याने ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस हवालदार आणि त्यांच्यासोबत मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ठाणे पश्चिमेकडील वर्तक नगरमध्ये बुधवारी सकाळी ही घटना घडली. पोलिस हवालदार सुनील रावत (वय ४५) आणि निशा रामपूरकर (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत. गेल्या काही वर्षांपासून सावरकर नगरमध्ये राहणाऱ्या रावत यांनी नुकतेच वसंत विहार परिसरात नवीन घर खरेदी केले होते. नवीन घराची नोंदणी करण्यासाठी ते सकाळी अकराच्या सुमारास बाहेर गेले होते आणि रामपूरकर त्यांना या प्रक्रियेत मदत करीत होते. दुचाकीवरून ते वर्तक नगरकडे जात असताना हा अपघात झाला.
वर्तक नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेस टॉवरजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. रावत आणि महिला दोघेही दुचाकीवरून फेकले गेले आणि डंपरने त्यांना चिरडले, ज्यात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून पसार झाला. वर्तक नगर पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. रावत यांच्या पश्चात पत्नी, १७ वर्षांचा मुलगा आणि १० वर्षांची मुलगी असा परिवार आहे. ते २०१४ मध्ये ठाणे शहर पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून रुजू झाले आणि सध्या गुन्हे शाखा युनिट ५ मध्ये कार्यरत होते.
संबंधित बातम्या