मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune News : विजेचा शॉक बसल्याने पुण्यातील दौंड तालुक्यात आई वडिलांसह मुलाचा मृत्यू, घरात नसल्याने सुदैवाने मुलगी वाचली

Pune News : विजेचा शॉक बसल्याने पुण्यातील दौंड तालुक्यात आई वडिलांसह मुलाचा मृत्यू, घरात नसल्याने सुदैवाने मुलगी वाचली

Jun 17, 2024 01:58 PM IST

Three Died Due to Electric shock in Pune : पुण्यात दौंड तालुक्यात दापोडी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. विजेच्या शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

विजेचा शॉक बसल्याने पुण्यातील दौंड तालुक्यात आई वडिलांसह मुलाचा मृत्यू, घरात नसल्याने सुदैवाने मुलगी वाचली
विजेचा शॉक बसल्याने पुण्यातील दौंड तालुक्यात आई वडिलांसह मुलाचा मृत्यू, घरात नसल्याने सुदैवाने मुलगी वाचली

Three Died Due to Electric shock in Pune : पुण्यात दौंड तालुक्यात दापोडी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. विजेच्या शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आंघोळ करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला विजेचा शॉक लागला. त्याच्या आवाजाने त्याची पत्नी देखील धावली. तिलाही शॉक लागला तर त्यांचा मुलगा देखील त्यांना वाचवण्यासाठी धावला असता त्यालाही शॉक लागल्याने त्याचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे दापोडी गावावर शोककळा पसरली आहे.

सुरेंद्र देविदास भालेकर (वय ४४) त्यांनी पत्नी अदिका सुरेंद्र भालेकर (वय ३८) व मुलगा प्रसाद सुरेंद्र भालेकर अशी शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. ही घटना आज सकाळी घडली. त्यांची मुलगी ही क्लाससाठी घराबाहेर गेल्याने ती सुदैवाने वाचली.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भालेकर कुटुंब हे गेल्या पाच वर्षापासून दापोडी येथील अडसूळ यांच्या खोल्यांमध्ये राहत होते. या सर्व खोल्या पत्र्यांच्या होत्या. दरम्यान, त्यांच्या खोलीच्या शेजारीच विजेचा खांब आहे. आज सकाळी ७ च्या सुमारास सुरेंद्रहे आंघोळीला गेले होते. यावेळी ते तारावर टॉवेल टाकत असताना अचानक त्यांना विजेच्या तारेचा जोरदार धक्का बसला. यामुळे ते ओरडले. दरम्यान, त्यांच्या आवाजाने तत्काळ त्यांना वाचवण्यासाठी मुलगा प्रसाद याने धाव घेतली तर त्यालाही विजेचा धक्का धक्का बसला. त्यांची पत्नी अदीका ही देखील तिथे आली. ती देखील मदतीसाठी धावली. यावेळी तिला देखील विजेचा जोरदार धक्का बसला.

चौघांच्या या कुटुंबातील या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू बसला. या घटनेमुळे दापोडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरेंद्र भालेकर हे बांधकामाची कामे करत होते. तर त्यांचा मुलगा हा केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयात १२ वीमध्ये होता. त्यांची पत्नी ही शेतात मजुरीचे काम करत होती. गेल्या पाच वर्षापासून हे कुटुंब या ठिकाणी राहत होते. मात्र, आज काळाने या कुटुंबावर घाला घातला. या घटनेमुळे दौंड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी विद्युत कर्मचारी दाखल झाले असून अपघात कसा झाला याचा तपास केला जात आहे. पोलिसांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तसेच हा अपघात कसा झाला याचा तपास केला जात आहे.

एकुलती एक मुलगी वाचली

भालेकर यांची लहान मुलगी वैष्णवी ही सकाळी कोचिंग क्लासला सकाळीच घराबाहेर गेली होती. त्यामुळे ती घराबाहेर गेली होती. ती घरात नसल्याने तिचा जीव वाचला असे परिसरातील नागरिक यांचे म्हणणे आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर