Two brother died in Karad due to elctric shock : सातारा जिल्ह्यातील कराड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोवारे येथे विजेचा शॉक लागून दोघा भावांचा मृत्यू झाला आहे. थोरल्या भावाला आधी शॉक लागला. यानंतर त्याला वाचवायला गेलेल्या धाकट्याभावाला देखील शॉक लागल्याने त्याचाही मृत्यू झाला. विहिरीजवळ असलेल्या फ्युजबॉक्सचा शॉक लागल्याने ही घटना घडली.
मिळालेल्या माहीतीनुसार तुकाराम सदाशिव खोचरे (वय ५५) व शहाजी सदाशिव खोचरे (वय ५०) अशी वीजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तुकाराम व शहाजी खोचरे यांची गावाजवळच शेती आहे. येथे त्यांची विहीर आहे. शेतीला पाणी देण्यासाठी वीजपंप सुरू करण्यासाठी तुकराम हे गेले होते. दरम्यान, फ्युजबॉक्समधून विद्युत पुरवठा सुरू होता. ही बाब तुकाराम यांच्या लक्षात आली नाही. त्यांनी फ्यूजबॉक्सला हात लावल्याने त्यांना जोरदार शॉक लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही बाब त्यांचा भाऊ शहाजी यांच्या लक्षात आली ते तुकाराम यांना वाचवण्यासाठी गेले असता त्यांना देखील विजेचा जोरदार शॉक लागला. यामुळे त्यांचा देखील मृत्यू झाला.
दरम्यान, रात्र झाली तरी दोघे भाऊ घरी परतले नाही. यामुळे घरच्यांची चिंता वाढली. त्यांनी त्यांच्या फोनवर देखील संपर्क साधला. मात्र, फोन लागला नाही. त्यामुळे त्यांची मुले त्यांचा शोध घेण्यासाठी शेतात गेले. यावेळी विहिरीजवळ दोघांचेही मृतदेह पडून असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तातडीने वीज प्रवाह बंद केला. या घटनेची माहिती इतर कुटुंबीयांना देखील देण्यात आली. दरम्यान, पोलिस देखील घटनास्थळी आले. त्यांनी देखील तपासणी आणि पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह हे पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या ४ शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रय वळसे पाटील कृषी फार्मच्या शेततळ्यात ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. या घटनेने निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे.
संबंधित बातम्या