मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Suicide: प्रियकर बेरोजगार म्हणून प्रेयसीचा दुसऱ्याशी साखरपुडा; विरहातून तरुणाची आत्महत्या

Suicide: प्रियकर बेरोजगार म्हणून प्रेयसीचा दुसऱ्याशी साखरपुडा; विरहातून तरुणाची आत्महत्या

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 06, 2024 09:56 PM IST

Nagpur Suicide: नागपुरात प्रेयसीने दुसऱ्याशी सारखपुडा केल्याने बेरोजगार तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.

Death (Representative Image)
Death (Representative Image)

Nagpur Amar Nagar Suicide: नागपूर येथील अमरनगर परिसरातून धक्कादायक माहिती समोर आली. प्रेयसीने दुसऱ्याशी साखरपुडा केल्याने प्रियकराने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी घडली. मृत तरुण बेरोजगार होता आणि त्याच्या प्रेयसीचा दुसऱ्याशी सारखपुडा झाल्याने तो गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. अखेर सोमवारी त्याने घरातील स्वयंपाकघरात गळफास लावून आत्महत्या केली.

राहुल राजेंद्र साखरे (वय, २४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल हा नागपूर एमआयडीसी परिसरात राहायला होता. त्याच्या आई वडिलांचे निधन झाले असून तो आजी आणि बहिणीसोबत राहत होता. राहुल हा गेल्या अनेक दिवसांपासून बेरोजगार होता आणि स्वत:चा खर्च भागवण्यासाठी तो एका गोदामात काम करीत होता. परिसरातील एका तरुणीवर त्याचे प्रेमसंबंध होते. मात्र, तरुणीच्या कुटुंबांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले. रविवारी तिचा साखरपुडा झाला. यामुळे राहुल तणावात गेला. रविवारी मध्यरात्री त्याने घरातील स्वयंपाक घरात गळफास लावून आत्महत्या केली.

दरम्यान, सोमवारी सकाळी राहुलची आजी उठून स्वयंपाक घरात गेली असता तिथे तिला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर आजीने आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी राहुलच्या घराच्या दिशेने धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

WhatsApp channel