मुंबईत एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसच्या मुलाखतीसाठी बेरोजगारांची झुंबड; चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईत एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसच्या मुलाखतीसाठी बेरोजगारांची झुंबड; चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती

मुंबईत एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसच्या मुलाखतीसाठी बेरोजगारांची झुंबड; चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती

Jul 17, 2024 09:57 AM IST

Stampede like situation in Mumbai Airport : मुंबईत कलिना येथे एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये वॉक-इन मुलाखतीचे आयोजन केले होते. या दरम्यान, मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुण आले होते. अचानक झालेल्या गर्दीमुळे या ठिकाणी चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईत एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसच्या मुलाखतीसाठी बेरोजगरांची झुंबड; चेंगराचेंगरी सदृश्य पॅरिस्थिती
मुंबईत एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसच्या मुलाखतीसाठी बेरोजगरांची झुंबड; चेंगराचेंगरी सदृश्य पॅरिस्थिती

Stampede like situation in Mumbai : मुंबईत कलिना येथे एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये वॉक-इन मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखतीसाठी मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुण आले होते. तब्बल २५ हजार पेक्षा अधिक तरुण आल्यामुळे अचानक गर्दी झाली. या गर्दीत चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

मुंबई विमानतळावरील एअर इंडिया ग्रुप मार्फत कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी आज परीक्षेचा आयोजन करण्यात आलं होतं सकाळी साडेआठ वाजता या परीक्षेसाठी हजारो परीक्षार्थी उपस्थित राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबई विमानतळ परिसराबाहेर गर्दी उसळली. यामुळे काही काळ गोंधळ देखील निर्माण झाला.

मुंबई विमानतळावरील एअर इंडिया ग्रुप मार्फत कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सकाळी साडेआठ वाजता, या परीक्षेसाठी हजारो परीक्षार्थी उपस्थित राहिले. मोठ्या प्रमाणावर मुंबई विमानतळ परिसराबाहेर गर्दी उसळली. तरुणांची ही गर्दी हाताळतांना विमानतळ प्रशासनाच्या नाकी नऊ आले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने अर्जदारांना त्यांचे बायोडेटा जमा करून परिसर सोडण्यास सांगण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

३०० जागांसाठी भरतीचे आयोजन

एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीतर्फे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण २७०० जागा भरल्या जाणार आहेत. टप्प्या-टप्प्याने ही भरती राबवली जाणार आहे. याच भरतीच्या पहिल्या टप्प्याचे आज आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. सुरुवातीला ३०० जागांसाठी परीक्षा घेतली जाणार होती. या साठी तब्बल २५ हजार बेरोजगार तरुण मुले भरतीच्या ठिकाणी आले. यामुळे मोठा गोंधळ उडाला. मुंबई एअरपोर्ट गेट क्रमांक ५ बाहेर हा गोंधळ झाला होता.

परिस्थिती नियंत्रणात

सध्या या ठिकाणची परिस्थिती काही वेळाने नियंत्रणात आली. आलेल्या तरुणांकडून त्यांचे अर्ज जमा करून घेण्यात आले. आणि त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. तरुणांच्या या गर्दीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांची संख्या वडत आहे. त्यामुळे जॉब मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. त्यात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात तरुण प्रयत्न करत असतात. एयर इंडिया सारख्या मोठ्या सरकारी ठिकाणी नोकरी मिळावी या हेतूने तरुणांची झुंबड विमानतळ परिसरात उडाली होती.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर