मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Arun Gawli : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला दिलासा! तुरुंगातून होणार कायमची सुटका

Arun Gawli : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला दिलासा! तुरुंगातून होणार कायमची सुटका

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 05, 2024 01:44 PM IST

Underworld Don Arun Gawli : कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणी नाशिक जेलमध्ये असलेला कुख्यात गुंड अरुण गवळी याची तुरुंगातून कायमस्वरूपी सुटका होण्याची शक्यता आहे.

डरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला दिलासा! तुरुंगातून होणार कायमची सुटका
डरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला दिलासा! तुरुंगातून होणार कायमची सुटका

Underworld Don Arun Gawli : कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणी नाशिक जेलमध्ये असलेला कुख्यात गुंड अरुण गवळी (Underworld Don Arun Gawli) याची तुरुंगातून कायमस्वरूपी सुटका होण्याची शक्यता आहे. या संदर्भात न्यायालयाने सरकारला आदेश दिले असून १० जानेवारी २००६ च्या शासन निर्णयानुसार शिक्षेत सूट देण्याच्या मागणीवर पुढील ४ आठवड्यात निर्णय घ्या असे देखील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Wadettiwar : शिंदे गटाचे निम्मे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा दावा

कुण्यात गुंड अरुण गवळी याला कोर्टाने दिलासा दिला आहे. सरकारच्या २००६ च्या निर्णयानुसार त्याने मुदतपुर्व सुटका व्हावी या साठी न्यायलयाकडे अर्ज केला होता. यावर निर्णय देत न्यायालयाने सरकारला आदेश दिले असून यावर ऊतर देण्यासाठी कारागृह प्रशासन आणि सरकारला चार आठवड्याची मुदत दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास अरुण गवळीची निवडणुकी आधी सुटका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोर्टाच्याय आदेशांवर जेल प्रशासन काय निर्णय घेणार या कडे लक्ष लागून आहे.

गुंड अरुण गवळीला मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या केल्या प्रकरणी आणि आणखी एका दुसऱ्या गुन्ह्याप्रकरणी दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली असून सध्या गवळी हा नागपूरच्या कारागृहात आहे.

Congress manifesto : काँग्रेसच्या जाहीरमान्यात आरक्षणाबाबत मोठं आश्वासन; सत्ता येताच करणार 'या' १० गोष्टी

शासनाचा निर्णय काय आहे.

सरकारने २००६ रोजी वयाची ६५ वर्ष पूर्ण झालेल्या तसेच अशक्त, असेलल्या आणि अर्धी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेतून सूट देणीयचे जाहिअर केले होते. शासनाच्या या निर्णयानुसार अरुण गवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे शिक्षेतुन मुक्तता मिळावी यासाठी अर्ज केला होता. या निर्णयानुसार सध्या अरुण गवळी याचे वय हे ६९ असून त्याने त्याने १६ वर्ष तुरुंगात घालवले आहेत. त्यामुळे शासन निर्णयानुसार तो शिक्षेच्या माफिला पात्र ठरतो. त्यामुळे त्याने न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. यावर न्यायालयाने सुनावणी घेत गवळीची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

कमलाकर जामसंडेकर खून प्रकरण

गुंड अरुण गवळीने मुंबईचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची हत्या करण्याची सुपारी घेतली होती. मालमत्ता वादातून सदाशिव सुर्वे नावाच्याव्यक्तिने गवळी गँगला ही सुपारी दिली होती. या साठी प्रताप गोडसेला गवळीने नेमले होते. या साठी दुसऱ्या हल्लेखोरांची निवड करण्यात आली. श्रीकृष्ण गुरवने ही सुपारी नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांना दिली. यासाठी त्यांना अडीच लाख रुपये देणीयचे ठरले होते. त्यानुसार दोघांनी जामसंडेकर याच्यावर पाळत ठेऊन त्याची २ मार्च २००७ रोजी राहत्या घरात घुसून हत्या केली होती.

IPL_Entry_Point