मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नऊ वर्षापूर्वी मेलेल्या नवऱ्याला हॉटेलमध्ये चिकन कोरमा खाताना पाहिले; महिलेच्या पायाखालची जमीन सरकली

नऊ वर्षापूर्वी मेलेल्या नवऱ्याला हॉटेलमध्ये चिकन कोरमा खाताना पाहिले; महिलेच्या पायाखालची जमीन सरकली

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 25, 2023 03:55 PM IST

Viral News: यूकेच्या वेस्ट ससेक्समधील एका हॉटेलच्या जाहिरातीत एका महिलेने ९ वर्षांपूर्वी मेलेल्या तिच्या नवऱ्याला पाहिले.

Viral News
Viral News

Viral Story: एखाद्या मेलेल्या व्यक्तीवर तुमच्या डोळ्यांसमोर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि तीच व्यक्ती काही दिवसांनी तु्म्हाला कुठेतरी दिसली तर तुमच्यासाठी यापेक्षा मोठा धक्का नसेल. अशीच एक घटना यूकेच्या एका महिलेसोबत घडली आहे. या महिलेच्या पतीचे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. पण वेस्ट ससेक्समधील एका गावात स्पाइस कॉटेज या रेस्टॉरंटने गेल्या आठवड्यात फेसबुकवर एक क्लिप पोस्ट केली होती. ज्यात संबंधित महिलेचा पती चिकन कोरमा खाताना तिला दिसला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षरक्ष: महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली.

मिळालेल्या माहितीनुसार, लुसी वॉटसन (वय,५९) असे संबंधित महिलेचे नाव आहे. तिचे पती हॅरी डोहर्टी याचे गेल्या नऊ वर्षांपूर्वी दिर्घ आजाराने निधन झाले. परंतु, वेस्ट ससेक्समधील एका रेस्टॉरंटने गेल्या आठवड्यात फेसबूकवर पोस्ट केलेल्या जाहीरातीत लुसीने तिच्या पतीला चिकन कोरमा खाताना पाहिले. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. नऊ वर्षांपूर्वी मेलेला माणूस अचानक असा जाहिरातीत कसा काय दिसू शकतो? असा प्रश्न तिला पडला. तिने जवळपास ३० वेळा हा व्हिडिओ पाहिला. तिला असं वाटलं की, कदाचित हा प्रोमो तिच्या पतीच्या मृत्युपूर्वी चित्रीत केलेला असू शकतो.

मेल ऑनलाईनशी बोलताना लुसी म्हणाली की, "फेसबुकमध्ये एका रेस्टॉरंटच्या जाहीरातीत मी माझ्या पतीला पाहिले. हा व्हिडिओ पाहून मी जोरात किंचाळले. या व्हिडिओ हॅरी चिकन कोरमा खात असावा. कारण चिकन कोरमा हा त्याचा आवडता पदार्थ होता." लुसीचे म्हणणे आहे की, हा जुना व्हिडिओ असावा. परंतु, रेस्टॉरंटन म्हटलं आहे की, आम्हाला खेद वाटतो की, लुसी यांचे पती या जगात नाहीत. परंतु हा प्रोमो आम्ही गेल्या आठवड्यात चित्रीत केला आहे.

WhatsApp channel

विभाग