शिवसेना पक्षफुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात सामील झालेल्या आमदार संतोष बांगर यांच्या हिंगोली मतदारसंघात जाहीर सभा घेत सडकून टीका केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप तसेच मोदी व देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला.
हिंगोलीतील सभेत उद्धव ठाकरेंनी भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, एकीकडे राज्यात दुष्काळ पडलाय आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री जपान दौऱ्यावर गेलेत. फडणवीस यांना मी बोलणं सोडलं आहे. मागे मी त्यांना कलंक बोललो होतो, त्यांना फडतूस बोललो, तर बोबाटा झाला होता. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही.त्यानंतर लोकांमधून टरबूज.. टरबूज अशी घोषणाबाजी झाली, त्यानंतरअरे टरबूजालाही पाणी द्यावं लागतं', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली.
संतोष बांगर यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, श्रावण महिना सुरू झाला आहे. नागपंचमी झाली. गद्दारांना साप समजून पूजायला लागलो. मात्र तो साप शेवटी डसलाच. पायाखाली साप आला तर शेतकऱ्यांना काय करायचे हे माहीत आहे. अवैध धंदे करणारा हिंदू असेल का, असू शकतो? हिंगोलीचे गद्दार उद्धटपणा करतात, त्यांना गाडून टाका,अशी टीका उद्धव ठाकरे हिंगोलीच्या सभेतून केली आहे.
माझी सभा ही जनतेसाठी आहे, गद्दारांसाठी नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. शंभू महाराजांचा आपल्यावर आशीर्वाद आहे. राष्ट्रवादी फोडल्यानंतर डबल इंजिन सरकारमध्ये आणखी एक डबा अजित पवार यांचा जुळला आहे. अजून किती डबे लागणार आहेत, जणू काय मालगाडी आहे का? डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, चौबल इंजिन. तुमच्या पक्षामध्ये चांगले नेते तयार करायचे काहीकर्तृत्व नाही.
भाजपमध्ये तुम्हाला नेते घडवता येत नाही का? तुमच्या पक्षात नेते नाहीत का? तुम्हाला नेते माझे लागतात, वडीलही माझे लागतात.
संबंधित बातम्या