मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mla Disqualification :आमदार अपात्रता निकालाआधीच उद्धव ठाकरेंचे गंभीर आरोप, थेट सर्वोच्च न्यायालयात धाव

Mla Disqualification :आमदार अपात्रता निकालाआधीच उद्धव ठाकरेंचे गंभीर आरोप, थेट सर्वोच्च न्यायालयात धाव

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 09, 2024 03:32 PM IST

Shivsena Mla Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा उद्या निकाल येणार आहे. मात्र त्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने उद्धव ठाकरेंनी निकालाच्या शक्यतेवर शंका उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Shivsena Mla Disqualification
Shivsena Mla Disqualification

Shivsena Uddhav Thackeray : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत उद्या ( १० जानेवारी) विधानसभा अध्यक्ष अंतिम निकाल देणार आहेत. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत आमदार अपात्रतेचा चेंडू विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्यापासून आमदार अपात्रतेच्या याचिकांवरविधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी पार पडली आता उद्या अंतिम निकाल दिला जाणार आहे.

मात्र निकालाची तारीख ठरल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची भेट घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या भेटीचा आधार घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, न्यायमूर्तीच आरोपीला भेटले, असा हा प्रकार आहे. कारण आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेचा खटला दाखल केला असताना अध्यक्ष नार्वेकर त्यांना दोनदा जाऊन भेटतात. अशा स्थितीत आम्ही न्यायाची तसेच पारदर्शी निकालाची अपेक्षा कशी करावी? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

एखाद्या प्रकरणात जर न्यायमूर्ती आरोपीला जाऊन भेटत असतील तर आम्ही त्या न्यायमूर्तींकडून काय अपेक्षा करावी? असा सवाल उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेतउद्धव ठाकरे गटानेसर्वोच्च न्यायालयातधाव घेत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

आमदार अपात्रता प्रकरणात उद्या येणाऱ्या निकालाबाबत शंका उपस्थित करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ज्या पद्धतीने या प्रकरणाची हाताळणी सुरू आहे; त्यावरून लोकशाहीचा खून होतोय की काय, अशी चिन्ह दिसत आहेत. आम्ही जनतेच्या न्यायालयात लढणारी लोकं आहोत. आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणाचा निकाल आपल्या देशातली लोकशाही जिवंत राहणार की नाही, हे ठरवेल.

 

देशात लोकशाही आहे की नाही, हे ठरवणारा उद्याचा निर्णय असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. बुधवारी शिवसेना अपात्रता प्रकरणी (Shiv Sena MLA disqualification case) निर्णय येणार आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केले.

WhatsApp channel