Uddhav Thackeray : अयोध्या झालं, गोवा झालं… महाराष्ट्राचं काय?; उद्धव ठाकरेंचा ज्योतिरादित्य शिंदे यांना सवाल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : अयोध्या झालं, गोवा झालं… महाराष्ट्राचं काय?; उद्धव ठाकरेंचा ज्योतिरादित्य शिंदे यांना सवाल

Uddhav Thackeray : अयोध्या झालं, गोवा झालं… महाराष्ट्राचं काय?; उद्धव ठाकरेंचा ज्योतिरादित्य शिंदे यांना सवाल

Jan 05, 2024 07:42 PM IST

Uddhav Thackeray Questions Jyotiraditya Scindia : उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील विमानतळाच्या रखडलेल्या नामकरणाबाबत प्रश्न केला आहे.

Uddhav Thackeray - Jyotiraditya Shinde
Uddhav Thackeray - Jyotiraditya Shinde

Uddhav Thackeray Questions Jyotiraditya Scindia : अयोध्या व गोव्यातील विमानतळांच्या नामकरणाचं स्वागत करताना माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला नामकरणाविषयीच्या धोरणाची आठवण करून दिली आहे. महाराष्ट्रातील दोन विमानतळांच्या नामकरणासाठी दोनदा पाठवलेल्या प्रस्तावाचं काय झालं, असा सवालही त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे. अयोध्येतील विमानतळाचं ‘महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असं नामकरण झालं आहे. त्याचप्रमाणं, गोव्यातील विमानतळाला 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्यात आलं आहे.

याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी पत्रात केला आहे. गोवा विमानतळाच्या नव्या नावात भाजपचे कार्यकर्ते व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर ह्यांचा उल्लेख आहे. तर, अयोध्या विमानतळाच्या नव्या नावात महर्षि वाल्मिकी यांचा उल्लेख आहे. ही दोन्ही नावं स्वागतार्ह आहेत, असं सांगतानाच, उद्धव ठाकरे यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे.

Jitendra Awhad : प्रभू राम बहुजन होता असं म्हटलं की तुम्हाला एवढा राग का येतो?; धमक्या देणाऱ्यांना आव्हाडांचा प्रश्न

'महाविकास आघाडी सरकारनं औरंगाबाद विमानतळाचं ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं ’दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' करण्याचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठवला होता. त्यावेळी, 'कोणत्याही व्यक्तींच्या नावावरून नव्हे तर संबंधित शहराच्या नावावरून विमानतळांचं नामकरण करण्याचं भारत सरकारचं धोरण आहे. त्यामुळं हा विलंब होत आहे, अशी तांत्रिक अडचण आम्हाला सांगण्यात आली होती. आता दोन्ही विमानतळांना व्यक्तींची नावं देण्यात आली आहेत. हाच नियम आमच्या राज्यातील विमानतळांना सुद्धा लागू होतो का याची माहिती द्यावी, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मागच्या दहा वर्षात महाराष्ट्रावर अन्याय

'महाराष्ट्र राज्याला गेल्या दशकभरात सतत अन्यायकारक वागणुकीचा सामना करावा लागला आहे. आम्ही विमानतळांना ज्या २ व्यक्तींची नावे दिली आहेत आणि केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवली आहेत, त्यांना परिचयाची गरज नाही. तरीही, लाल फितीच्या कारभारामुळं होणारा विलंब चिंताजनक आहे. श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला अशा प्रकारे दुर्लक्षित केलं जात असल्याचं पाहून दुःख होतं. त्याचप्रमाणं, दि. बा. पाटील ह्यांचंही समाजासाठी मोठं योगदान आहे. त्यामुळं या दोन्ही विमानतळांच्या नामकरणाची प्रक्रिया वेगाने करावी, अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर