मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  "..ते सर्व बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेनं दिलं हे लक्षात ठेवा" - उद्धव ठाकरे

"..ते सर्व बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेनं दिलं हे लक्षात ठेवा" - उद्धव ठाकरे

HT Marathi Desk HT Marathi
Jun 22, 2022 07:29 PM IST

माझ्यासोबत आता जे सहकारी आहेत, ते बाळासाहेबांच्या सोबतचेच आहेत. मधल्या काळात त्यांना जे काही मिळालं, ते बाळासाहेबांच्या शिवसेनेनंच दिलं,'' असंही ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

Shiv Sena vs Eknath Shinde: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली असून पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० ते ४६ आमदार असल्याचा दावा केला आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूकद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांना उद्देशून चांगल्याच कानपिचक्या दिल्या. 

"मुख्यमंत्री का भेटत नव्हते, त्याचे कारण म्हणजे माझी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतरचे दोन तीन महिने फार विचित्र होते, त्यामुळेच मी भेटत नव्हतो. मी भेटत नव्हतो, हा मुद्द बरोबर आहे. आता मी भेटायला सुरुवात केली आहे. बर, भेटत नव्हतो म्हणजे काम होतं नव्हते असे नाही. मी पहिली कॅबिनेट मिटींग रुग्णालयातून केली होती. शिवसेना  आणि हिंदुत्व जोडलेले शब्द आहेत. शिवसेना आणि हिंदुत्व कधीची वेगळे होऊ शकत नाहीत. सेनेने हाच नारा दिला आहे. विधान भवनात हिंदुत्वावर बोलणारा मी एकमेव होतो.

..ते सर्व बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिले – मुख्यमंत्री 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अनेकजण म्हणत आहेत की, शिवसेना बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेली आहे. पण, २०१२ मध्ये बाळासाहेब गेले, त्यानंतर २०१४ मध्ये सेना एकटी लढली. त्यानंतर आताही लढत आहोत. तेव्हाही शिवसेना बाळासाहेबांची होती, आताही आहे. माझ्यासोबत आता जे सहकारी आहेत, ते बाळासाहेबांच्या सोबतचेच आहेत. मधल्या काळात त्यांना जे काही मिळालं, ते बाळासाहेबांच्या शिवसेनेनंच दिलं,'' असंही ठाकरे म्हणाले.

IPL_Entry_Point