मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : मला मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवलं; मात्र.., उद्धव ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

Uddhav Thackeray : मला मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवलं; मात्र.., उद्धव ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 23, 2022 05:21 PM IST

माझ्याशी आणि शिवसेनेची गद्दारी केली पण निदान बळीराजाची गद्दारी करू नका.शेतकरी संकटामध्ये सापडला असताना तुम्ही फक्त घर-घर फिरत आहात, सरकार उत्सवात रमत आहे,अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

उद्धव ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं
उद्धव ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

औरंगाबाद - उद्धव ठाकरे आज औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील-शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. उद्धव म्हणाले की, मला मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवलं हरकत नाही. माझ्याशी आणि शिवसेनेची गद्दारी केली पण निदान बळीराजाची गद्दारी करू नका. शेतकरी संकटामध्ये सापडला असताना तुम्ही फक्त घर-घर फिरत आहात, सरकार उत्सवात रमत आहे,अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद जिल्ह्यातील दहेगाव आणि गंगापूर परिसरातील गावांची पाहणी केली.यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकटयेणे काही नवे नाही. मात्रअशावेळी शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांना मदत करायची असते. आता सरकारकडून नुसती घोषणाची अतिवृष्टी सुरू आहे. या सरकारकडे भावनाचा दुष्काळ आहे. कृषिमंत्री आले नाही, मुख्यमंत्री आले नाहीत. हे उत्सवी सरकार आहे, उत्सव मग्न सरकार आहे. फक्त उत्सव साजरे केले जात आहेत. मी उत्सव साजरे करा असं म्हणत नाही. पण उत्सव साजरे करत असताना आपल्या राज्यातील जनता, शेतकरी समाधानी आहे की नाही, हे पाहण्याचे काम सरकारचे आहे. यामध्ये हेसरकार अपयशी ठरत असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की,गेल्या काही दिवसांपासून पुण्यात प्रचंड पाऊस झाला, पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही,असं उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नाची उत्तर असतात. आता ते असंही म्हणतील, ग्रामीण भागामध्ये किती पाऊस पडावा, हे सरकारच्या हातात नसतं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या