Uddhav Thackeray News: महाराष्ट्रात घडलेल्या सत्तांतरानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकेरे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले. सावंतवाडी येथील गांधी चौकात पार पडलेल्या जनसंवाद सभेत ठाकरे यांनी संवाद साधत कोकणच्या भविष्याचा मांडत एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यावर निशाणा साधला. आमच्यासोबत येणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना विविध प्रकारच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. परंतु, आमचेही दिवस येतील. तेव्हा सर्व व्याजासह फेडू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या गणपत गायकवाड प्रकरणावरून उद्धव ठाकरे म्हणाले की, हे सरकार पुन्हा आल्यास पुढील प्रजाकसत्ताक दिन साजरा करता येणार नाही. देशात हुकमशाही असणार. मिंधेची गँग मुंबईत आहे. ल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर गणपत गायकवाड म्हणतात, माझे मिंधेंकडे करोडो रुपये आहेत. आता मोदींची गॅरंटी मिंधेना पावणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनेवर त्यांनी टीका केली. "मी मोदी यांच्या विरोधक नाही. आम्ही सोबत २५- ३० वर्ष राहिलो. परंतु, चांगले काहीच झाले नाही. त्यामुळे त्यांची साथ सोडली. प्रधानमंत्री स्वनिधी योजना म्हणजे पंतप्रधानांच्या स्वत:साठी ही योजना आहे का ? पंतप्रधान मत्सनिधी योजनेचा लाभ सर्वात जास्त लाभ गुजरातला दिला. कोकणाला किती लोकांना हा लाभ मिळाला? असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
संबंधित बातम्या