अजमेर शरीफ दर्गा वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पाठवली चादर, ख्वॉजा मोईनुद्दीन चिश्ती ८१३ वा ऊरुस
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अजमेर शरीफ दर्गा वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पाठवली चादर, ख्वॉजा मोईनुद्दीन चिश्ती ८१३ वा ऊरुस

अजमेर शरीफ दर्गा वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पाठवली चादर, ख्वॉजा मोईनुद्दीन चिश्ती ८१३ वा ऊरुस

Dec 24, 2024 07:57 PM IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानातून आज अजमेर शरीफला हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गाच्या ८१३ व्या ऊरुसाच्या निमित्ता चादर पाठवली गेली.

उद्धव ठाकरेंनी  अजनेर शरीफला पाठवली  चादर
उद्धव ठाकरेंनी अजनेर शरीफला पाठवली चादर

Uddhav Thackeray sent chadar to ajmer sharif : अजमेर दर्गा शरीफ ख्वॉजा मोईनुद्दीन चिश्ती ८१३ वा ऊरुस लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवार (२४ डिसेंबर) अजमेर शरीफला चादर पाठवली. ही चादर खादिम सय्यद जिशान चिश्ती यांच्याकडे सोपवली गेली.

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानातून अजमेर शरीफला हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गाच्या ८१३ व्या ऊरुसाच्या निमित्ता चादर पाठवली गेली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत, शिवसेना उपनेते नितिन नांदगावकर, मुजफ्फर पावस्कर, कमलेश नवले, नौमान पावस्कर आणि उपशाखा प्रमुख गणेश माने आदी उपस्थित होते.

भाजप बनवू शकते मुद्दा -

अजमेर शरीफ दर्ग्याच्या खाली शिवमंदिर असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. या दाव्याबाबत न्यायालयात खटला सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी ही चादर पाठवली आहे. अशा परिस्थितीत विरोधक हा मुद्दा उपस्थित करू शकतात.

२४ जानेवारी रोजी पुढली सुनावणी -
राजस्थानमधील अजमेर दर्ग्याच्या खाली शिव मंदिर असल्याचा दाव्याबाबत २० डिसेंबर रोजी सिविल कोर्टात दुसऱ्यांदा सुनावणी झाली. कोर्टाने याचिकाकर्ते आणि दुसऱ्या बाजूच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर निकालाची तारीक २४ जानेवारी २०२५ दिली आहे.

अजमेर सिविल कोर्टाने अल्पसंख्याक मंत्रालय, दर्गा कमेटी अजमेर आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) ला नोटीस पाठवली होती. कोर्टात अन्य पाच लोक /संस्थांनी स्वत:ला पक्षकार बनवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्याचबरोबर दर्गा कमेटीचे वकील अशोक माथुर यांनी ही याचिका फेटाळून लावण्याबाबत अर्ज केला होता. दरम्यान विष्णु गुप्ता आणि अंजुमन कमेटीच्या वकिलांनी आपले य़ुक्तीवाद सादर केले. दर्गा दीवान यांचा मुलगा नसीरुद्दीन चिश्तीही कोर्टात पोहोचले.

त्यांनी म्हटले की, आम्ही ख्वॉजा साहबचे वंशज आहोत. आम्हाला पक्षकार बनवले पाहिजे होते. आम्ही कोर्टात आपली बाजू मांडली व पक्षकार बनवण्यासाठी याचिका दाखल केली. दुसरीकडे अजमेर दर्ग्यात मंदिर असल्याचा दावा करणारे विष्णु गुप्ता यांनी म्हटले की, कोर्टात वर्शिप एक्ट (worship act) बाबत चर्चा झाली. त्यामध्ये आमचे वकील वरुण कुमार सिन्हा यांनी म्हटले की, दर्गा वर्शिप एक्ट(worship act)अंतर्गत येत नाहीत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर