मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray aurangabad rally: उध्दव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

Uddhav Thackeray aurangabad rally: उध्दव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 08, 2022 09:47 PM IST

औरंगाबादमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. वाचा उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे..

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

औरंगाबाद - औरंगाबादमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या बाबरीला गेलेल्या दावाची हवाच काढली. मुख्यमंत्री म्हणाले की, आता देवेंद्र फडणवीस सांगतात की, मी बाबरीला तिथे गेलो होतो. आपले मोरेश्वर सावे बाबरी पाडायला गेले होते की नाही? देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे आलेले सावे यांचे चिरंजीव जे आमदार झाले त्यांनी सांगावं की माझे बाबा गेले नव्हते. सांगावं, तुमच्याकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमदार झालेत. खरं-खोटं सांगू टाकावं' असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेतील महत्वाचे मुद्दे –

  1. आज जवळपास सहा महिन्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या आवडत्या संभाजीनगरला. आज वर्धापनदिन शिवसेनेचे पहिले पाऊल. मी तेव्हा एका गच्चीवरून ती १९८७ सालची सभा बघितली. आपल्याला आता मैदान पुरत नाही. तुमच्या रुपात तुळजाभवानीचे दर्शन. आकाशातून सभेची दृश्ये बघितली टीव्हीवर साक्षात देवच बघतो आहे. ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते त्यासाठी सैनिकांची शक्ती वाया घालवायची नाही.
  2. हिंदुत्व आपला श्वास ह्याच मैदानात शिवसेनाप्रमुख बोलले. पहिल्यांदा पाणी प्रश्नावर बोलणार कुठेही फसवेगिरी नाही. हा प्रश्न बिकट होता. आता सुधारणा झाली की नाही?जुनी योजना हातात दंडा घ्या आणि पहिले संभाजीनगरला पाणी द्या. जुन्या योजनेसाठी समांतर योजनेला पैसे देणार. कोरोनात वर्ष गेली. पण आता किंमती वाढल्या खर्च वाढणार पण शासनाने याची जबाबदारी घेतली. कंत्राटदार अडून बसला तर सरळ तुरूंगात टाका. काल सुध्दा वाईल्ड लाईफ बोर्डाची बैठक घेतले हे तुमच्या सरकारने घेतले. आक्रोश मोर्चा सत्ता गेली म्हणून पाण्यासाठी नाही. तुम्ही किती पैसे दिले तेव्हा. आम्हाला खोट बोलणे शिकवलेले नाही. रस्त्यासाठी निधी दिलेला आहे. कामाला हात घायलाय सुधारताहेत. छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण,म्युझियम,अगदी मेट्रोसाठी पण गरज पडली तर मेट्रो करु विध्दवंसक नाही शहराची शान वाढवणारे काम आपण करु हे वचन.
  3. संभाजीनगर नामांतर कधी करणार हे कोण सांगणार त्यांनी हे माझ्या वडिलांचे वचन. एक दीड वर्षाआधी ठराव झाला आहे केंद्राकडे दिलेला आहे तुम्ही झाकून ठेवायचे. मी नामांतर करेल तेव्हा आदर्श करेल. पाणी देईल,रस्ते देईल. नाहीतर संभाजी महाराज म्हणतील टकमक टोक दाखवतो. एकमुखी ठराव केला करुन आणा आम्ही तुमचा सत्कार करु.
  4. महागाई रूपया घसरत चाललाय,आम्हाला चिंता शिवलिंग कुठे आहे. आमच हिंदुत्व तुम्ही कोण ठरवणार. चला एकदा होऊन जाऊ द्या. बाबरी पडल्यावर यांची पळापळ. आता फडणवीस सांगतात. आपले सावे महापौर होते त्यांच्या चिरंजीवांनी जे तुमच्याकडे आले सांगावे माझे बाबा गेले नव्हते. कुणाला शिकवता,अडवाणी,अटलजी,भंडारी यांची विधाने आताची. बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली, अमरनाथ यात्रा,हे स्वतःला विचारा.
  5. कश्मीर पंडितांवर पुन्हा तीच वेळ,कुणालाच काही पडले नाही. तिकडे जाऊन चालिसा पढा. नामर्दाच हिंदुत्व आमच नाही पहिले तिकडे जा. मी बाळासाहेब हे मध्ये नाव आहे म्हणून मी आहे. पण त्यांचे हिंदुत्व आम्ही शिकलो. मला देवळात घंटा बडवणारा नाही अतिरेकी बडवणारा. हिंदू हित की बात करेंगा ही तव्हाची घोषणा. कोर्टाचा निर्णय तुमचा नाही. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. बेलगाम सुटलेले भाजपचे प्रवक्ते. जर आमच्यावर वेडी वाकडी टीका केली तर आम्ही पण सोडणार नाही. हा हिंदुत्वाचा,वारकरी भगवा. इकडे चालिसा तिकडे जाऊन शिव्या द्यायचा. इतकी वर्ष शिवसेनाप्रमुखांनी इस्लामचा मुसलमानाचा द्वेष करा असे सांगितले नाही. इतरांचा द्वेष करायचा नाही. देश हाच माझा धर्म. धर्माच्या आड कुणी अंगावर आला तर सोडणार नाही.
  6. भाजप नेत्याने प्रेषितांचा अपमान काय संबंध यांचा. आपल्याला माफी मागायला लावली. देशाच्या पंतप्रधान फोटो कचरा कुंडीवर ही परिस्थिती भाजपने आणली. भाजपची भुमिका देशाची भूमिका नाही. मतभेद असतील पण ही वेळ येऊ नये. मी संघा बद्दल बोललो. सगळे भाजपवाले त्या सभेत भगव्या टोप्या घालून. मी संघावर टीका नाही केली पण त्यांची मातृ संस्था त्यांची कार्टी बघा त्यांच्या कानाखाली लावा. भागवतांची भूमिका स्वागतार्ह. आता परिस्थिती सुधारते आहे.
  7. दावोसला महाराष्ट्रात ८० हजार कोटींचे उद्योग. पंतप्रधान म्हणतात महाराष्ट्रात विरोधी पक्ष भाजप सगळ सुरळीत सुरु असतांना सुपारी देतोय कुठे भोंगे,चालिसा. इथे पण आलेल्या मुस्लमान शिवसैनिक त्यांना हिंदुत्व माहिती आहे.
  8. काश्मिरी पंडिताची हत्या होते आहे. एक सैनिक गनमॅन त्याचे अपहरण मग मृतदेह मिळाला त्याचे नाव औरंगजेब. तो देशासाठी लढला तो धर्माने कुणी असला तरी तो आमचा हे आमचे हिंदुत्व. विकासकामे आपण करतो आहे. महामार्गात पण जालना येणार. घृष्णेश्वर मंदिर संवर्धन. गड किल्ले संवर्धन, संत विद्यापीठ,हे हिंदुत्व नाही तुमच्या डोक्यात कधी कल्पना नाही आली. हे बघवत नाहीए. अडीच वर्ष झाली,रोज स्वप्न मी पुन्हा येणार. महाराष्ट्र पुढे नेणारी ही अडीच वर्षे तुमच्या आशिर्वादाने,प्रेमाने विश्वासाने. ज्यांच्यासोबत भांडलो ते सोबत मात्र मित्र हाडवैरी झाले. एक काळ संपूर्ण कानाकोपऱ्यात शिवसेना भाजप अस्पृश्य होते. पण २५-३० वर्ष आमचा उपयोग नंतर तुम्हाला डोळ्यात खुपायला लागली. काढा यादी अटलजी आले तेव्हा किती होते आज किती आहेत. इतकी वर्ष ज्यांनी जपल.
  9. एक दिवस गोपिनाथजी घरी आले बाळासाहेबांनी त्यांची विनंती एका क्षणात भाजपचा महापौर मान्य केला. भागवत कराड आता केंद्रात. पंतप्रधान बैठकीत एकाने सांगितले कर्ज मिळत नाही. कराड म्हणाले मी कर्ज मिळवून देतो. मी अजून एक विनंती केली तीन लाख बिन व्याजी कर्ज राज्य सरकारने दिले. तुम्ही दिल्लीत केंद्राने काढलेले २%अनुदान परत आणा. आक्रोश करायचा असेल तर भाजपने तिकडे आक्रोश करा. आपण बीड मॉडल प्रमाणे योजना यावी, असा आपला आग्रह. मत मिळाल्यावर कोण शेतकरी कसला शेतकरी ही आमचे हिंदुत्वात बसत नाही. अच्छे दिन कधी येणार,निवडणुका आल्या की पुन्हा धर्माची गोळी. मुद्दे भरकटवायला जातात पंतप्रधानटंना आवाहन सांगा कुठल्या मुद्दयावर बोलायचे. उज्वला योजना रडत खडत,पेट्रोल डिझेल दर वाढवायचे. मग थोडा विरोध झाला कमी करायचा
  10. राजेश खन्ना आज का एम एल ए चित्रपटाची आठवण,व्यापाऱ्यांची दरभाव किस्सा. आपल्या सरकारने पाणी पट्टी कर कमी केले. गुंठेवारीचा प्रश्न सोडवला वचन दिल्याप्रमाणे. विकासाचे काम वेगात सुरु आहे फाईव्ह स्टार एम आय डी सी. राज्यातल्या युवकांना रोजगार उद्योग येऊ नये म्हणून भाजपचा अपप्रचार. मग कुठे सीबीआय ईडी. काश्मीरमध्ये या धाडी टाका. पंडित भयभयीत एकही भाजप प्रवक्ता यावर बोलत नाही. होय जे शक्य ते आम्ही करणार हे आमचे वचन. हे आपलेच लोक. तुमचे अपयश. भाजप केंद्रात विरोधात असता तर तुम्ही काय केले असते?
  11. भाजपने एकदा भारत बंद नारा दिला आपण सोबत म्हणून नाहीतर त्यांची ताकद नाही. गणपतीचा पहिला दिवस बाळासाहेबांना विचारले ते नाही म्हणाले. सुषमा स्वराजांना फोन केला त्या म्हणाल्या गणपती तर दहा दिवस. आपण नाही म्हणालो. पेट्रोल वाढीनंतर बैलगाडीतून जाणारी भाजपा कुठे गेली. हेच तुम्हाला हवे होते का? प्रवक्ते वाचाळपणे बोलतात. देशाची अब्रू गेली भाजपची नाही. मी विचारतो भाजपला अरे कुठे नेऊन ठेवणार आहात हिंदुस्थान व महाराष्ट्र माझा. तुम्ही शिवसेनेला नाही हिंदुत्वाला बदनाम करताय. शिवसेनेचे विचार तुम्ही काढू शकणार नाही.
  12. शिवसैनिकांचे आशीर्वाद प्रेम म्हणून मी तुमच्या समोर येऊ शकतो. आमचे हिंदुत्व शोधू नका,हाताला काम तरच हिंदुत्व,शिवसेनेचे हिंदुत्व गदाधारी. गधा आम्ही मागेच सोडला. सभेला विचारणा भाड्याची लोक सभेत आहेत का?सभेतून नाहीचा उत्स्फूर्त प्रतिसाद. तुमच्या दर्शनाने १०० हत्तींचे बळ. हे प्रेम असेच ठेवा.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या