Milind Narvekar Property : लोकसभा निवडणूक, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका पार पडल्या असून आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका १२ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे विश्वासू स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यांनी उमेवारी अर्ज दाखल केला आहे. मिलिंद नार्वेकर हे दहावी पास असून त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी सादर केलेल्या निवडणूक शपथ पत्रातून उघड झाले आहे.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी नार्वेकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिलिंद नार्वेकर यांनी मंगळवारी अर्ज सादर केला आहे. यात त्यांनी त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्ती, शिक्षण व त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती दिली आहे. नार्वेकर यांच्याकडे व त्यांच्या पत्नीकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांचे शिक्षण हे १० वी झाले आहे. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. नार्वेकर यांच्या कडे ४५ हजार रुपये रोख तर त्यांच्या पत्नीकडे ३६ हजार रुपये रोख रक्कम आहे. त्यांच्या बँक खात्यात ७४ लाख १३ हजार २४३ रक्कम तर पत्नीच्या बँक खात्यात ८ कोटी २२ लाख ११८ ऐवढी रक्कम आहे. नार्वेकर यांनी बॉण्ड्स आणि म्युचल फंडमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. त्यांनी ५० तर त्यांच्या पत्नीने १२ कोटी ४० लाख ८२ हजार ५२६ कोटी रुपये बॉन्ड आणि म्युचुयल फंडमध्ये गुंतवले आहे. तर पोस्ट ऑफिस व पॉलिसीमध्ये देखील मिलिंद नार्वेकर यांनी ३ लाख ६८ हजार ७२९ रुपये गुंतवले आहे. तर त्यांच्या पत्नीचे ६७ लाख ८८ हजार ५५८ रुपये गुंतवले आहेत.
मिलिंद नार्वेकर यांच्या मालकीची कोकण व बीडमध्ये जमीन आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड (तालुका दापोली) येथे ७४.८० एकर जमीन आहे. यात त्यांच्या पत्नीचा ५० टक्के वाटा आहे. तर बीड जिल्ह्यात बाणेवाडी येथे ०.१९ एकर जमीन आहे. आणि बंगळूर येथे त्यांच्या पत्नीच्या नावावर २३२५ स्क्वेअर फूट जमीन आहे. तर मुंबईत मालाड व बोरिवली येथे १००० स्क्वेअर फुटाचे घर असून पत्नीच्या नावावर अलिबाग येथे फार्म हाऊस आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे ४ कोटी १७ लाख ६३ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावे ११ कोटी ७४ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
मिलिंद नार्वेकर व त्यांच्या पत्नीकडे कोट्यवधी रुपयांचे दागिने आहेत. यात सोने चांदी व हिऱ्यांचे दागिने आहेत. त्यांच्याकडे ३५५.९४ ग्रॅम सोने आहे. त्याची बाजार भावाप्रमाणे २४ लाख ६७ हजार ९८१ रुपये किंमत आहे. तर चांदी १२.५६ किलोग्रॅम आहे. त्याची किंमत ९ लाख ७४ हजार ६५६ रुपये आहेत. तर ८०.९३ हीरे असून त्याची किंमत ही ३६ लाख ८५ हजार आहे. नार्वेकर यांच्या पत्नीकडे ७१ लाख २८ हजार रुपयांचे दागिने आहेत. ४२५ ग्रॅम सोने असून त्याची किंमत २९ लाख २६ हजार रुपये, चांदी ६.२६ किलो असून तयाची किंमत ४ लाख ८५ हजार आहे. तर हिरे ९०.९६ असून त्याची किंमत ३३ लाख ४९ हजार रुपये आहे.
मिलिंद नार्वेकर यांनी शेयर मार्केटमध्ये देखील कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. श्री बालाजी कॉम. एलएलपी कंपनी आहे. त्यात ५० टक्के शेयर्स त्यांचे तर पत्नीचे ५० टक्के शेयर्स आहेत. त्यांनी १० कोटी ११ लाख २८ हजार रुपयांचे तर त्यांच्या पत्नीने ३१ कोटी २५ लाख ३३ हजार रुपयांची गुंतवणूक शेयरमध्ये केली आहे.
संबंधित बातम्या