मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray: वाजत गाजत या, पण परंपरेला गालबोट लावू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

Uddhav Thackeray: वाजत गाजत या, पण परंपरेला गालबोट लावू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 23, 2022 07:58 PM IST

उद्धव ठाकरे (UddhavThackeray) म्हणाले की, १९६६ पासून आपलाविजया दशमीचा मेळावा होतो. कोरोनामुळे यात दोन वर्षे खंड पडला मात्र ही परंपरा सुरू आहे. न्यायदेवतेने विश्वास सार्थ ठरवला. माझ्या सर्व शिवसैनिकांना आवाहन आहे की,उत्साहाने, वाजत गाजत या, पण शिस्तीने या.. आपल्या तेजस्वी परंपरेला, वारश्यालागालबोट लावू नका

उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

Uddhav Thackeray on dasara melava: मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करत न्यायालयाचे आभार मानले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, दसरा मेळाव्यासाठी(dasara melava) कार्यकर्त्यांनी वाजत गाजत यावे परंतू आपल्या या परंपरेला गालबोट लागेल असे वागू नये, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे. माझ्या बहिणी व भावांनी आमच्या परंपरेला पुढे न्यायचे आहे म्हणून शिस्तीने वागावे. आमच्यावर कोणी बोट दाखविण्याची हिंमत करू नये, असे ठाकरे म्हणाले.

शिवाजी पार्क मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी आज उच्च न्यायालयाने ठाकरे यांना दिली. हायकोर्टाच्या निर्णयानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला आहे. राज्यभरात शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. हायकोर्टाच्या निकालानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसैनिकांना मोलाचा सल्ला दिला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, १९६६ पासून आपला विजया दशमीचा मेळावा होतो. कोरोनामुळे यात दोन वर्षे खंड पडला मात्र ही परंपरा सुरू आहे. न्यायदेवतेने विश्वास सार्थ ठरवला. माझ्या सर्व शिवसैनिकांना आवाहन आहे की,उत्साहाने, वाजत गाजत या, पण शिस्तीने या.. आपल्या तेजस्वी परंपरेला, वारश्याला गालबोट लावू नका.. इतर काय करतील त्याची कल्पना नाही, पण आपली परंपरा जपा. दसरा मेळाव्याकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशासह जगभरातील मराठी माणसाचं लक्ष असतं. त्यामुळे उत्साहात या, वाजत गाजत या, पण कुठेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

आपण सर्व शुभ बोल नाऱ्या सारखे वागुयात. विजया दशमीच्या दिवशी माझ्या आजोबांनी पहिला मेळावा घेतला होता. कोरोनाच्या काळातील अपवाद वगळता हा मेळावा आजवर नियमित झालेला आहे. राज्य सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्याची आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडेल, अशी अपेक्षा आहे, अ सेठाकरे म्हणाले.

 

सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांवरील सुनावणीबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की,सर्वोच्च न्यायालय शिवसेनेच्या वादावर जो निकाल देईल तो देशाच्या लोकशाहीचे भविष्य ठरविणारा निकाल असेल. आम्ही न्यायदेवतेवर संशय घेतलेला नाही. आजचा हा लोकशाहीच्या विजयाचा दिवस आहे. न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला, असे ठाकरे म्हणाले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या