शिवसेनेतील बंड अन् शिंदे गटाच्या इशाऱ्यानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नवनियुक्त आमदारांकडून लिहून घेतले शपथपत्र
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनेतील बंड अन् शिंदे गटाच्या इशाऱ्यानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नवनियुक्त आमदारांकडून लिहून घेतले शपथपत्र

शिवसेनेतील बंड अन् शिंदे गटाच्या इशाऱ्यानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नवनियुक्त आमदारांकडून लिहून घेतले शपथपत्र

Nov 25, 2024 04:46 PM IST

Uddhav Thackeray : शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असून त्यांना एकत्र यायचे आहे. एकनाथ शिंदे गटाच्या या दाव्यानंतर उद्धव शिवसेना सतर्क झाल्याचे मानले जात आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक
उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक

विधानसभा निवडणुकीत महायुतीचे २३५ उमेदवार निवडून आले. शिवसेनेतीलबंडानंतर जितके आमदार एकनाथ शिंदे यांच्य़ासोबत गेले होते,त्यापेक्षा अधिक आमदार आता विजयी झाले आहेत. तर,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे २०आमदार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्या आहेत. मात्र सत्तास्थापनेपूर्वीच अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे सतर्क झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली असून आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतले आहेय घेतले जाणार असल्याची माहिती आहे. अडीच वर्षापूर्वी झालेल्या शिवसेनेतील बंडातून मोठा धडा घेत ठाकरेंकडून ही खबरदारी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठ्या पराभवाचा सामना करावा करावा लागला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५६ आमदार जिंकलेल्या उद्धव ठाकरे यांना यावेळी केवळ २० आमदार विजयी करता आले आहेत. एकनाथ शिंदे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या. अशा तऱ्हेने आधीच पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावलेल्या उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे गटाने नवं टेन्शन दिलं आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असून त्यांना एकत्र यायचे आहे. एकनाथ शिंदे गटाच्या या दाव्यानंतर उद्धव शिवसेना सतर्क झाल्याचे मानले जात आहे.

भास्कर जाधव यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड -

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी सोमवारी सर्व २० आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत आमदारांना पक्षबदल करणार नसल्याचे लेखी स्वरुपात देण्यास सांगण्यात आले आहे. या सर्व आमदारांकडून शपथपत्रे घेण्यात आली असून, त्यात पक्षाशी एकनिष्ठ राहू आणि जो नेता निवडला जाईल त्याला ते स्वीकारतील, असे लिहिले आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांना अधिकार देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर मातोश्रीवर झालेल्या बैठकीतही यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून भास्कर जाधव यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. म्हणजेच जाधव विधानसभेत पक्षाचे नेतृत्व करतील. याशिवाय आदित्य ठाकरे यांना मोठी जबाबदारी देत त्यांची विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही पक्षांच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. सुनील प्रभू हे सभागृहात पक्षाचे मुख्य सचेतक राहतील.

दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे यांनी भीतीपोटी ही बैठक बोलावली होती. कारण त्यांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्या आमदारांकडून पक्षबदल करणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र घेण्यात आले आहे. उद्धव गटाला मोठा धक्का बसला असून निवडणूक निकालानंतर संजय राऊत यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार कसे जिंकत आहेत? निकालावर माझा विश्वास नाही आणि काही तरी गडबड झाली असावी. इतकंच नाही तर हा निकाल आश्चर्यकारक असून त्यावर आम्ही मंथन करू, असंही काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.

Whats_app_banner