'मोदी म्हणजे भारत नाही; तुमच्या नेत्यावर टीका देशाचा अपमान नाही’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray on Modi : तुमचा नेता म्हणजे माझा भारत देश असं मुळीच नाही, माझा देश इतका शुद्र नाही. यांच्यासाठी क्रांतीकारी फासावर गेले, आपले रक्त सांडले आहे का, असा परखड सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मालेगाव - तुमचा नेता म्हणजे माझा भारत देश असं मुळीच नाही, माझा देश इतका शुद्र नाही. मोदींवर टीका केली तर भारताचा अपमान नाही, मोदी म्हणजे भारत हे कुणाला मान्य आहे का? यांच्यासाठी क्रांतीकारी फासावर गेले, आपले रक्त सांडले आहे का, तुमच्या कुटुंबावर बोललं तर लगेच पोलिसांची कारवाई करतात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मालेगाव येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटावर चौफेर तोफ डागली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी शिंदे-भाजपवर तुफान हल्लाबोल चढवत तुम्ही खंडोजी खोपडेंची औलाद आहात, गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही..आयुष्यभर तुमच्यावरचा गद्दार शिक्का पुसला जाणार नाही. असा घणाघात त्यांनी शिंदेंवर केला. तर, भाजपवरही ठाकरेंनी हल्लाबोल केला. मिंधेंच्या नेतृत्वात तुम्ही निवडणुका लढणार का? तुमची १५२ कुळं खाली उतरली तरी ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकत नाही, असा घणाघात केला.
सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे सुरुवातीलाच म्हणाले की, आज माझ्या हातात काही नाही. तरीही एवढी मोठी गर्दी झाली आहे. जनसमुदाय जमला आहे. ही सगळी माझ्या पूर्वजांची पुण्य़ाई आहे. तुम्ही मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी शपथ घेतली. पण मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी नाही तर तुमच्या प्रश्नांसाठी उभा आहे. लोकशाही वाचवण्यासाठी उभा आहे. आता एकच ब्रिदवाक्य समोर ठेवा. आता जिंकेपर्यंत लढायचं. आता एकच विचारतो आता जिंकेपर्यंत सोबत राहणार का, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी तुम्हाला पुन्हा सांगतो जर तुम्ही सध्याच्या सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्तेत बसवलं तर ती निवडणूक आपल्या देशातील शेवटची निवडणूक असेल. पुन्हा या देशात निवडणुका होणार नाहीत.