मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोठी बातमी.. मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ बंगला सोडला, मुक्काम ‘मातोश्री’वर हलवला
मुख्यमंत्री आजच‘वर्षा’सोडणार
मुख्यमंत्री आजच‘वर्षा’सोडणार
22 June 2022, 22:04 ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
22 June 2022, 22:04 IST
  • मुख्यमंत्र्यांचं फेसबूक लाईव्ह पाहून आता मोठी घडामोड समोर येत आहे. उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर राहायला जाणार आहेत.

मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरशिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बंडखोर नेते आणि राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. या संवादामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना भावनिक साद घातली. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचं? गुजरातला जाऊन बोलायची काय गरज आहे. मुख्यमंत्री नको असं मला सांगावं मी राजीनामा देण्यास तयार आहे. ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन सांगावे,मी मुख्यमंत्रीपद तसेच शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांचं फेसबूक लाईव्ह पाहून आता मोठी घडामोड समोर येत आहे. उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर राहायला जाणार आहेत.

 

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ३४ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी या बंडखोर आमादारांना समोर येऊन चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच तुम्हाला मी नकोय असं स्पष्टपणे सांगितल्यास मी लगेच मुख्यमंत्रीपद सोडेन,असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. इतकच नाही तर मुख्यमंत्री आजच आपण वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरुन ‘मातोश्री’वर मुक्काम हलवत असल्याचंही सांगितलं.

 

माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे?मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहीत नाही. तुम्ही पळता कशाला?त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार आहे,”असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, “आजच मी वर्षावरुन मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला,”असंही बंडखोर आमदारांना सांगितलं.