मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : शांत आहोत, पिसाळायला लावू नका; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

Uddhav Thackeray : शांत आहोत, पिसाळायला लावू नका; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 05, 2022 09:32 PM IST

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने शिवसैनिकांना त्रास देऊ नये.जोपर्यंत शिवसैनिक शांत आहेत तोपर्यंत राहूद्या, पिसाळायला लावू नका, असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपला दिला.

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा
उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला यंदा न भूतो न भविष्यती महत्व प्राप्त झाले होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार व कोणा-कोणावर निशाणा साधणार याविषयी चर्चा सुरू होती. आज दादरच्या शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची ठाकरी तोफ धडाडली. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने शिवसैनिकांना त्रास देऊ नये. जोपर्यंत शिवसैनिक शांत आहेत तोपर्यंत राहूद्या, पिसाळायला लावू नका, असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपला दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, पोलिसांकडून शिवसैनिकांना शिंदे गटात जाण्यासाठी धमकावत आहेत. शिवसैनिकांना त्रास देत आहेत. हे असेच सुरू राहिल्यास शिवसैनिक चवताळून उठल्याशिवाय राहणार नाही.

शिवसेनेचा वाघआनंद दिघे हे कायम पक्षाशी एकनिष्ठ होते. जातानाही ते भगव्यातून गेले. त्यांनी भगवा कधीही सोडला नाही. आता राज्य सरकारमधील काही लोक जाणूनबुजून आमच्या शिवसैनिकांना त्रास देत आहेत. पण मी आधीच सांगून ठेवतोय, जोपर्यंत शांत आहोत तोपर्यंत शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका. माझ्या शिवसैनिकांवर अन्याय कराल, तर खपवून घेणार नाही. तुमचा कायदा तुम्ही मांडीवर कुरवाळत बसा. एकतर्फी कायद्याचा वापर आम्ही होऊ देणार नाही," असा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

शिवसेना एकट्या दुकट्याची नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे. एक जरी निष्ठावंत शिवसैनिक उठून बोलला की निघून जा, तर मी असाच पायऱ्या उतरून घरी निघून जाईन.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या