Uddhav Thackeray: वैद्यकीय तपासणीनंतर उद्धव ठाकरे यांना एच. एन. रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray: वैद्यकीय तपासणीनंतर उद्धव ठाकरे यांना एच. एन. रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज

Uddhav Thackeray: वैद्यकीय तपासणीनंतर उद्धव ठाकरे यांना एच. एन. रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज

Updated Oct 16, 2024 09:11 AM IST

Uddhav Thackeray discharged from hospital: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एच. एन. रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई: उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज
मुंबई: उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज

Uddhav Thackeray Health Updates: शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सोमवारी (१४ ऑक्टोबर २०२४) अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील एच. एन. रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे सर्व वैद्यकीय चाचण्या पार पडल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी परतले आहेत.

उद्धव ठाकरे यांना सविस्तर आरोग्य तपासणीसाठी मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी सोमवारी दिली. शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती. 'आज (सोमवारी) सकाळी उद्धव ठाकरे यांनी सर एचएन रिलायन्स रुग्णालयात पूर्वनियोजित सविस्तर तपासणी केली. तुमच्या शुभेच्छांमुळे सर्व काही ठीक आहे आणि ते काम करण्यास आणि लोकांची सेवा करण्यास पूर्णपणे तयार आहेत, असे आदित्य यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले.

महायुतीनंतर महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले होते की, ‘महायुतीनंतर महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करेल. संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपची अवस्था इतकी वाईट आहे की, त्यांना चोर आणि देशद्रोह्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी लागत आहे. महायुतीला आधी आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करू द्या, त्यानंतर आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण आहे? हे आम्ही तुम्हा सर्वांना सांगू. सरकारमध्ये असल्याने महायुतीने आधी आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा’, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी केले.

महाविकास आघाडीकडून 'गद्दारांचा पंचनामा' या पुस्तिकेचे प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने रविवारी 'गद्दारांचा पंचनामा' या पुस्तिकेचे प्रकाशन करून महायुतीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राच्या धर्माशी गद्दारी करत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत दोन आघाडीत चढाओढ पाहायला मिळणार आहे. शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांचा समावेश असलेली महाविकास आघाडीचा सामना भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्याशी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, यावेळी महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, हे येत्या २३ नोव्हेंबरला स्पष्ट होईल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर