मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जे घरंदाज आहेत, त्यांनीच घराणेशाहीवर बोलावे; उद्धव ठाकरेंचा मोदींना बोचरा टोला

जे घरंदाज आहेत, त्यांनीच घराणेशाहीवर बोलावे; उद्धव ठाकरेंचा मोदींना बोचरा टोला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 13, 2024 11:43 AM IST

Uddhav Thackeray on PM Narendra Modi : अयोध्या येथे २२ तारखेला राम मंदिर सोहळा असून या दिवशी उद्धव ठाकरे हे नाशिक येथील काळाराम मंदिरात जाऊन आरती करणार आहेत. याचे निमंत्रण ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले आहे.

Narendra Modi - Uddhav Thackeray
Narendra Modi - Uddhav Thackeray

Uddhav Thackeray on PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल सेतु कार्यक्रमात शुक्रवारी घरंदाजीवर टीका करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान, याच व्यक्तव्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 'जे घरंदाज आहेत, त्यांनीच घरणेशाहीवर बोलावे. गद्दारांची घराणेशाही चालते का? म्हणजे, गद्दार तुम्हाला लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही प्राणप्रिय आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

मोठी बातमी! मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचं ढाक्यात इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!

असे ठाकरे म्हणाले. दरम्यान, २२ तारखेला ठाकरे गटाकडून भरपूर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे आरती करणार असून त्याचे निमंत्रण त्यांनी थेट राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना दिले आहे.

पंतप्रधान म्हणतायत हा दिवस दिवाळी झाली पाहिजे. २२ जानेवारीला दिवाळी साजरी करा, पण त्यानंतर देशाचं जे दिवाळं निघालं आहे त्यावर सुद्धा त्यांनी चर्चा करावी. काल मुंबईत अटल सेतूचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले. या पूलाला अटल बिहारी बाजपेयी यांचे नाव दिले. मात्र, कार्यक्रमात कुठेही त्यांचा फोटो नव्हता, आयोध्येत राम मंदिरांचे उद्घाटन होत आहे पण राम मंदिरात रामाची मूर्ती असेल की नाही माहिती नाही, अशी टीका देखील मोदी यांच्यावर ठाकरे यांनी केली.

चीन, पाकिस्तानला भरणार धडकी! क्षेपणास्त्र डागण्यात माहिर असलेला पहिला स्वदेशी लाईटवेट टँक 'जोरावर' तयार

ठाकरे पुढे म्हणाले, मी देशभक्त आहे, मात्र, अंधभक्त नाही. कारसेवकांनी जर धाडस केलं नसतं, तर आजचं राम मंदिर झालं नसतं. राम मंदिर हा कारसेवकांचा गौरव आहे. झेंडे लावायला अनेक जण येतात, पण लढण्याची वेळ होती, तेव्हा तुम्ही कुठे होतात? शिवसेनेची घोषणा होती; पहले मंदिर, फिर सरकार, मात्र, याचा विसर त्यांना पडला आहे, असे ठाकरे म्हणाले.

अयोध्येला जाणार का असा प्रश्न विचारल्यावर ठाकरे म्हणाले, मी अयोध्येला नक्की जाणार आहे. राम मंदिर हे काही कुणाची खासगी मालमत्ता नाही, ज्या ज्यावेळी माझ्या मनात येईल त्या त्यावेळी मी अयोध्येत जाणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.

WhatsApp channel