Uddhav Thackeray : १५०० रुपये देऊन महाराष्ट्र विकायला निघालेत; ‘लाडकी बहीण’वरून ठाकरेंचा महायुतीवर घणाघात-uddhav thackeray criticism mahayuti over vidhansabha election ladki bahin yojana ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : १५०० रुपये देऊन महाराष्ट्र विकायला निघालेत; ‘लाडकी बहीण’वरून ठाकरेंचा महायुतीवर घणाघात

Uddhav Thackeray : १५०० रुपये देऊन महाराष्ट्र विकायला निघालेत; ‘लाडकी बहीण’वरून ठाकरेंचा महायुतीवर घणाघात

Aug 10, 2024 11:42 PM IST

Uddhav Thackeray : १५०० रुपये लाच देऊन शिवरायांचा महाराष्ट्र विकायला निघालेत.प्रकल्प गुजरातला पळवताहेत. १५०० रुपयांसाठी महाराष्ट्र विकणार आहोत का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी महिलांना केला आहे.

‘लाडकी बहीण’वरून ठाकरेंचा महायुतीवर घणाघात
‘लाडकी बहीण’वरून ठाकरेंचा महायुतीवर घणाघात

लाडकी बहीण योजनेचेसुरुवातीचे४ हफ्ते देण्यासाठी निवडणूक पुढे ढकलली जात आहे. नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.जेणेकरूनयोजनेबाबतमहिलांचा विश्वास बसेल.मात्र महिलांनी ठरवले पाहिजे आम्हाला तुमचीभीक नको.१५ लाखाचे दीड हजार झाले. आता१५०० रुपये लाच देऊन शिवरायांचा महाराष्ट्र विकायला निघालेत.प्रकल्प गुजरातला पळवताहेत. १५०० रुपयांसाठी महाराष्ट्र विकणार आहोत का?सरकारीयोजना आहे. लाभ जरूर घ्या.पण हे त्यांच्या खिशातले पैसे नाहीत तरतुमचेच आहेत. असंम्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे व महायुतीवर जोरदार निशाणा साधला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ठाणे शहरातील गडकरी रंगायतन सभागृहात मेळावा पार पडला. या मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. ‘मिंधे सरकारकडून घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असल्याची’ टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले,५० हजार योजना दूतगावागावात पोहचणार आहेत.प्रत्येकाला १० हजार रुपये देणार आहेत. यांचीच माणसे, चेलेचपाटे हे योजनादूत म्हणून घुसवणार आणि त्यातून पैसा काढणार. जाहिरातींवर कोट्यवधी रुपये उधळले जात आहेत.

आपला भगवा भगवाच असला पाहिजे. त्यावर चिन्ह नको. हिंदुत्वाचा भगवा, शिवाजी महाराजांचा भगवा तोच झेंडा आपल्या हातात बाळासाहेबांनी दिला आहे. आतापासून मशालीचा प्रचार करा. स्वाभिमानाची मशाल घराघरात पेटवा. मी जंगल वाचवण्याचं काम करत होतो म्हणून आरे वाचवलं. छातीवर वार करतो. पाठीवर वार करत नाही. जे काही करायचे विधानसभा निवडणुकीत करायचे असं त्यांनी सांगितले.
ठाण्यात मनसेचा राडा! उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण, नारळ अन् बांगड्या फेकल्या; नंतर कार्यक्रमात घुसले, पाहा VIDEO

घोषणांचा पाऊस अन् अंमलबजावणीचा दुष्काळ -

मिंदे सरकार घोषणांचा पाऊस अन् अंमलबजावणीचा दुष्काळ करतंय. दुबार मतदानाची तक्रार करूनही जिल्हाधिकारी कारवाई करत नाही. ३ महिने थांबा, त्यानंतर शिंदेंची चांडाळ चौकडी सरकारी कलेक्टर सगळ्यांना कुठे पाठवतो ते बघा, यांना तुरुंगाचे गज मोजायला लावूया. ठाणे उभं राहण्यामागे शिवसेनाप्रमुखांचे प्रेम, ठाणेकरांचे शिवसेनेवर प्रेम आणि अपार मेहनत आहे. ही मेहनत झाली नसती तर शिंदेंची दाढी उगवली नसती असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर हल्लाबोल केला.

१५लाखाचे पंधराशे रुपये कसे झाले?

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. १५०० रुपये कसले देता. तुम्ही तर १५ लाख रुपये देणार होता. त्याचं काय झालं....वरचे शून्य कुठे गेले?असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

'नमक हराम२' चित्रपट काढणार -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदासाठी मविआचा चेहरा हे उद्धव ठाकरेच आहे,असं पुन्हा वक्तव्य केलं. ठाण्यातील मेळाव्यातून शिंदेंवर निशाणा साधताना राऊत यांनी म्हटले की, सापांचे फणे ठेचण्यासाठी कालच आलो असतो,मात्र,विधानसभेत सापांचे फणे ठेचणार आहे. ठाण्यातील सगळे सिनेमे काढताय,मलाही'नमक हराम२'चित्रपट काढायचा आहे. त्याची स्क्रिप्ट तयार असल्याचंही त्यांनी म्हटले. महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची गरज आहे.