मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एकही पोलीस सोबत न घेता या अन् शिवसेना कुणाची हे सांगा, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेना थेट आव्हान

एकही पोलीस सोबत न घेता या अन् शिवसेना कुणाची हे सांगा, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेना थेट आव्हान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 16, 2024 07:20 PM IST

Uddhav Thckeray challenge to CM shinde : राहुल नार्वेकर आणि मिंध्यांनीपोलीस संरक्षण न घेतामाझ्याबरोबर उभं रहावं.तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेनाकुणाची. असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे

Uddhav Thckeray challenge to CM shinde
Uddhav Thckeray challenge to CM shinde

विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या आमदार अपात्रता निकालाविरोधात उद्धव ठाकरेंनी आज मुंबईत महापत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या घटनेचे पुरावे दाखवले. २०१३ व २०१८ मधील पक्षाच्या बैठकीत घेतलेल्या ठरावांच्या व्हिडिओ क्लिप्सही सादर केल्या.  या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हिंमत असेल तर एकही पोलीस सोबत न घेता जनतेमध्ये या, आणि सांगा शिवसेना कुणाची, असं जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिलं आहे. 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. त्याविरोधात आज मुंबईत ठाकरे गटाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

या पत्रकार परिषदेत असीम सरोदे यांनी नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड करत त्यांचे निर्णय कसे चुकले, याचे मुद्देसूद स्पष्टीकरण केले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मागच्या आठवड्यात लबाडाने जो निकाल दिला. नाही नाही लवादाने जो निकाल दिला त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. आता सर्वोच्च न्यायालयाकडून आशा आहेतच. आज जनतेच्या न्यायालयात आम्ही आलो आहोत.

राहुल नार्वेकर आणि मिंध्यांनी पोलीस संरक्षण न घेता माझ्याबरोबर उभं रहावं. तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कुणाची. पोलीस संरक्षण न घेता जाहीर करा. मग कुणाला पुरावा, गाडावा आणि तुडवावा ते जनता ठरवेल. यासाठी माझी तयारी आहे, असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी नार्वेकर व मुख्यमंत्री शिंदेंना दिलं आहे.

तुमच्याकडं जर सगळं काही आहे, शिवसेना विकली असेल तर विकता येणार नाही हे लक्षात ठेवा. व्हीप तुमचा वगैरे आम्हाला लागू होणार नाही. व्हीपचा मराठी अर्थ चाबूक आहे. चाबूक आमच्या हातात शोभून दिसतो लाचारांच्या हातात नाही, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी केला. तसेच जर मी पक्षाचा अध्यक्ष नसतो व मला काहीच अधिकार नसते तर अमित शहा मातोश्रीवर का आले होते. २०१४ मध्ये मोदींना पाठिंबा देण्यासाठी मला दिल्लीला का बोलावलं होते. तिथे माझी सही का घेतली, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. 

WhatsApp channel