मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ramdas Kadam: उद्धव ठाकरे, अजित पवारांना जमलं नाही ते शिंदेंनी करून दाखवलं; रामदास कदमांकडून कौतुक
रामदास कदमांकडून शिंदे यांचे कौतुक
रामदास कदमांकडून शिंदे यांचे कौतुक

Ramdas Kadam: उद्धव ठाकरे, अजित पवारांना जमलं नाही ते शिंदेंनी करून दाखवलं; रामदास कदमांकडून कौतुक

01 September 2022, 17:59 ISTShrikant Ashok Londhe

मागच्या काळात जे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व अजित पवारांना जमले नाही, ते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी करून दाखवलं आहे, अशा शब्दात रामदास कदमांनी (Ramdas kadam) मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

रत्नागिरी – महाआघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांना निकषाच्या दुप्पट मदत, नैसर्गिक आपत्तीत ५० हजारांची तात्काळ मदत, पोलिसांना मुंबईत केवळ १५ लाखात हक्काचे घर देण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. मागच्या काळात जे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व अजित पवारांना जमले नाही, ते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी करून दाखवलं आहे, अशा शब्दात रामदास कदमांनी (Ramdas kadam) मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

रामदास कदम म्हणाले की, राज्यात आपलं सरकार आले असल्याची भावना  लोकांमध्ये निर्माण झाली आहे. यंदा गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना गावापर्यंत पोहचण्यास कुठलेही विघ्ने आली नाहीत. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी सुत्रे स्वीकारताच मुंबई-गोवा महामार्गावरचं काम प्रगतीपथावर आणले. एकनाथ शिंदे यांच्या खासदार मुलाने कोकणवासीयांसाठी तब्बल ४०० बसेस मोफत सोडल्या.  स्वत:साठी जगला तो मेला, दुसऱ्यासाठी जगला तो जगला असं काम एकनाथ शिंदे यांचे सुरू आहे. महत्वाचं म्हणजे शिंदे मंत्रालयात भेटतात. या आधीचे मुख्यमंत्री अडीच वर्षात केवळ ३ वेळा मंत्रालयात आले होते असा टोला रामदास कदमांनी (Ramdas kadam) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)  लगावला. 

राज्याचा मुख्यमंत्री कसा असावा हे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस एकत्र येत महाराष्ट्राच्या विकासाचा गाढा पुढे नेत आहेत. मी कोकणवासियांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो असं रामदास कदमांनी म्हटलं.